भोकरदन : भोकरदनसायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे हद्यीमध्ये अवैध दारु विक्री करणाऱ्या वर गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील कारवाई पोलिसानी केली,दरम्यान याआधी ही या इसमाना पोलीस ठाणे येथे बोलावुन अवैधपणे दारु विक्री न करणेबाबत सूचना देऊन देखील काही ठिकाणी अवैधपणे दारु विक्री होत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक किरण बिडवे याना मिळाली होती,
त्यावरुन पोलीस ठाणे हद्यीत किरण बिडवे यांनी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांना रवाना करुन एकाच वेळी सर्व ठिकाणावरील अवैध देशी दारु विक्री करणारे ईसमांवर छापा टाकुन १०७०० रुपयाची देशी दारु व ३८०० रुपयाची विदेशी दारु पकडुन सात ईसमाविरुध्द कार्यवाही करण्यात आली आसुन सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे व पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक काळे, पोउपनि सागर शिंद,
कुकलारे, सपोफौ दत्ता राऊत, भास्कर जाधव, हेडकॉन्सटेबल सोमनाथ मंडलिक दादाराव बोर्डे, पोलीस नाईक विकास जाधव, अरुण वाघ, संगीता मोकाशे, पोलीस कॉन्सटेबल संदीप भुतेकर, नंदकुमार दांडगे, शरद शिंदे,दिपक इंगळे,सुरेश ढोरमारे, गणेश पिंपळकर, लक्ष्मण राणगोते, कल्पना डोईफोडे, जयश्री कुहीरे पोलीस ठाणे भोकरदन अशांनी केली आहे,