भोकरदन : छत्रपती संभाजीनगर येथे मुप्टा शिक्षक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये सिल्लोडचे मुप्टा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. विजय वाकेकर यांची जिल्हा सहसचिव पदी एक मताने निवड करण्यात आली . संघटनेचे नेते प्रा. सुनील मगरे विभागीय अध्यक्ष राजेंद्र जाधव सर, विनाअनुदानचे प्रदेशाध्यक्ष शिवराम मस्के सर ,विभागीय कार्याध्यक्ष शेख मुनीर सर,जिल्हा अध्यक्ष पद्माकर कांबळे सर विभागीय कार्याध्यक्ष डॉ. प्रा .भास्कर टेकाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे .
नियुक्ती पत्रात म्हटले आहे की आज पर्यंत आपण केलेले मुप्टा शिक्षक संघटनेचे आपण केलेले कार्य व संघटना वाढीसाठी सुरू असलेले प्रमाणिक प्रयत्न लक्षात घेता संघटनेच्या छत्रपती संभाजी नगर जिल्हा सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. विजय वाकेकर यांच्या नियुक्तीचे श्री संजय पाखरे सर, डॉ.अनिल बाभळे, पत्रकार जी.टी. वाघ, गंगाधर जगताप सर, धनंजय जावळे सर, गणेश साळवे सर आत्माराम दौड सर , गोविंद गोरे सर , रवींद्र सोनवणे सर , मिलिंद वाघमारे सर, अनिल विसपुते सर, अरविंद सोनवणे सर ,शेख हरुण सर, शेख असलम सर , सुनील बोराडे सर, साहेबराव लाठे सर ,श्रीधर बच्छाव सर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.























