हदगाव तालुका प्रतिनिधी :-
अजातशत्रू म्हणून हदगाव- हिमायतनगर तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जिल्ह्याचे पहिले खासदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा प्रसिद्ध साहित्यिक दिवंगत हरिहरराव सोनुले व हदगाव च्या पहिल्या महिला नगराध्यक्षा दिवंगत श्रीमती अंजनाबाई सोनुले यांचे सुपुत्र माजी उपनगराध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य सुनील हरिहरराव सोनुले यांनी हदगाव-हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढविण्या संबंधीचा अधिकृत उमेदवारी अर्ज पक्षश्रेष्ठी तिल कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांच्याकडे दाखल केला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
सुनील सोनूले यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा नांदेड जिल्ह्याचे पहिले दिवंगत माजी खासदार हरिहरराव सोनुले यांनी जिल्हयाचे नेतृत्व केले होते,सुनील सोनूले यांच्या मातोश्री श्रीमती अंजनाबाई हरिहरराव सोनुले या पाच वर्ष महिला व बालकल्याण सभापती तसेच अडीच वर्षे हदगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष होत्या.सुनिल सोनुले यांच्या पत्नी सौ.कुमूद सोनुले या आदर्श विद्यार्जन मंडळाच्या विद्यमान उपाध्यक्षा तर हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील छत्तीस शाळेच्या सर्वात मोठ्या शासनमान्य सेवा सहकारी पतसंस्थेच्या पाच वर्षे चेअरमन राहिल्या आहेत, सुनील सोनुले यांनी कॉग्रेस पार्टीचे तिन वेळा नगरसेवक पद तर पाच वर्ष हदगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद भुषवले आहे.शहरातीत तत्कालिन साई नागरी सहकारी बँकेचे ते अडिच वर्ष उपाध्यक्ष होते तर काही वर्ष त्यांनी लॉयन्स क्लबच्या माध्यमातून ही समाजकार्य केले आहे,
प्रचंड पारदर्शक राजकारणाचा वारसा लाभलेले सुनील सोनुले हे हदगाव-हिमायतनगर तालुक्यात सुनीलभाऊ म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत. राजकीय लोकप्रियता मिळवत त्यांनी सर्व धर्मीयासाठी सामाजिक व धार्मीक कामे केल्याने ते सर्वच समाजात अक्षरशः भाऊंना आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून मान दिल्या जातो.
गोरगरीब जनतेच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिवंगत मा.खा हरिहरराव सोनुले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या आदर्श विद्यार्जन मंडळाच्या सचिव पदाचा कारभारही ते पाहतात. काँग्रेस पक्षाच्या सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या पुरोगामी विचारावर अतूट श्रद्धा व पक्षाशी एकनिष्ठ राहून लोकांची सेवा करेल, जवळपास गत तिन ते चार दशकांहून अधिकचा जनसंपर्क मतदार संघातील मायबाप जनतेचा पाठिंबा व आशीर्वाद या बळावर आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत असे त्यांनी सदर प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले. हदगाव-हिमायतनगर तालुक्यात आजातशत्रू म्हणून सर्वच धर्मात लोकप्रियता मिळवणाऱ्या सुनील सोनुले यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना फाल्गुणराव पटोले यांनी गोपनीय सर्वे करून सुनील सोनुले यांना आगामी विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
आघाडीचा धर्म पाळला :- नुकत्याच संपन्न झालेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयासाठी हदगाव शहरात प्रचाराचे नियोजन करून जबरदस्त प्रचार यंत्रणा राबवून सोनुले यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत नागेश पाटील आष्टीकर यांना दोन हजाराच्या वर मताधिक्य मिळवून दिले खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयाचे ते शिलेदार म्हणून ओळखले जात आहेत.