तभा वृत्तसेवा येरमाळा (सुधीर लोमटे )- हातलाई देवी क्रिडा संकुल धाराशिव येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येडशी येथील जनता विद्यालयाने बाजी मारली आहे .
दिनांक १६ रोजी धाराशिव येथे विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरावरील कुस्ती स्पर्धा पार पडल्या . त्यात १४ वर्षे वयोगटाखालील मुलांच्या ६२ किलो वजनी गटामध्ये ओंकार बालाजी पवार याने प्रथम क्रमांक मिळविला तर ५२ किलो वजनी गटामध्ये शंकर बबन राठोड याचा व्दितीय क्रमांक आला आहे . त्यानंतर १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या ४८ किलो वजनी गटामध्ये आर्यन शरद साळुंके याने प्रथम क्रमांक पटकावला तर ५५ किलो वजनी गटामध्ये थोडसरे केदार रंजीत याने व्दितीय क्रमांक मिळविला .
७१ किलो वजनी गटामध्ये आयान जमीर पटेल यांना प्रथम क्रमांक मिळविला आणि दुसऱ्या क्रमांकावर सुरज रामा काळे राहिला . ९२ किलो वजनी गटामध्ये यशराज बालाजी देशमुख याने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले . जनता विद्यालय येडशी येथील चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे या मल्लांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, शालेय समितीचे अध्यक्ष, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .