माहोरा > माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला मध्ये मुलीचे प्रशिक्षण शिबिर,
माहोरा ता.जाफ्राबाद महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन मंडळ व प्रशिक्षण परिषद पुणे व आकार सोशल वेंचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने इन्फोसिस फाउंडेशन गर्ल्स वेलनेस प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व मुली सहभागी झाल्या. या कार्यशाळेत किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यावर उपाययोजना त्याचप्रमाणे त्यांचे मानसिक व भावनिक आरोग्य चांगले राहावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष
प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकृष्णा चेके, सर होते तर प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हमीद सय्यद व समितीचे शिक्षक प्रतिनिधी जी. एच. पवार, व ए. डी. पवार, होते.
या कार्यशाळेत मुलींच्या मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या समस्या, या काळात मुलींनी घ्यायची काळजी तसेच स्वच्छतेच्या सवयी व सॅनिटरी पॅडचा योग्य वापर या विषयी श्रीमती शर्मा मॅडम, श्रीमती महाळंकर मॅडम,श्रीमती भांडेकर, मॅडम, व श्रीमती गरबडे मॅडम,यांनी सखोल मार्गदर्शन केले.
किशोरवयीन मुलींचे मानसिक व भावनिक आरोग्य या विषयावर श्री सुधिर लकडे,सर यांनी मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे पोक्सो कायद्याबद्दल सविस्तर माहिती दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षिका महाळंकर मॅडम, यांनी केले. तर आभार प्रदर्शन जेष्ठ श्रीमती बडगुजर मॅडम,यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खलसे, लहाने,फुसे,आर एस जाधव,जे. एम.सोनवणे, मळेकर,मंगेश जाधव , शेवाळे,पी.जी.पवार,यांनी प्रयत्न केले.