तभा फ्लॅश न्युज / सोलापूर : विधान भवन येथील लॉबीमध्ये गुरुवारी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली ही भाजपाच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. मुख्यमंत्री हे बघायचे भूमिका घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंदोलनावेळी चंद्रकांत पवार यांनी केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आली. लोकशाही वाचवा संविधान वाचवा, चले जाव चले जाव मुख्यमंत्री चले जाओ, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी करत विधानभवनामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी केलेल्या भ्याड हल्ला चा निषेध करण्यात आला.
गोपीचंद पडळकर हे वारंवार शरदचंद्र पवार यांच्या कुटुंबीयांवर आरोप करत असतात. पडळकर समर्थकांनी जो भ्याड हल्ला केला याला कळत नकळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचा आरोप दादाराव रोटे यांनी बोलताना केला.