तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने सरकारी वकील आणि नवनिर्वाचित खासदार उज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला.
खासदारपदाच्या निवडीबद्दल सोलापूर न्यायालय परिसरात हा गौरव समारंभ पार पडला. यावेळी सर्व उपस्थित वकिलांनी उज्वल निकम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.