तभा फ्लॅश न्यूज/माहूर : आगामी सण उत्सव काळात शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा,सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी माहूर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांच्यावतीने पथ संचलन करण्यात आले.
दि.7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत साजरा केला जाणाऱ्या नारळी पौर्णिमा (परिक्रमा) यात्रेनिमित्त माहुर येथे सुमारे पाच लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज गत यात्रेतील अनुभवावरून लावला जात आहे.या यात्रेदरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा,कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच बैल पोळा,गणेशोत्सव इत्यादी सण उत्सव शांततेत पार पडावे, कायदा,शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने माहूर पोलिसांच्यावतीने शहरातील मुख्य मार्गावरुन पथसंचलन करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले आहे.
या रुट मार्च मध्ये सपोनि पालसींग ब्राह्मण,सपोनि संदीप अन्येबोईनवाड, पोहेकॉ प्रकाश गेडाम,कैलास जाधव,पवन राउत, ज्ञानेश्वर खंदाडे,चालक जाधव यांचेसह महीला पोलीस कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस ठाण्यातर्फे पथसंचलन करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.