नवी दिल्ली : देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून, दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करून १२ वे स्वातंत्र्यदिन भाषण दिले. या सोहळ्यासाठी दिल्लीसह देशभरात सुरक्षा दल सतर्क ठेवण्यात आले आहेत.
ऐतिहासिक भाषणात मोदींनी एकतेचा संदेश देत तिरंग्याचे प्रत्येक भारतीयासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. लाल किल्ल्यावरील हा सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातून लोकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.