तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट ते गुरुवार, दिनांक २१ ऑगस्ट या कालावधीत सोलापूर जिल्ह्याचा दौरा निश्चित आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक १५ ते दिनांक १७ या शासकीय सुट्टी कालावधीत खातेप्रमुख व गट विकास अधिकारी यांनी दौऱ्यावर जाऊ नये तसेच सदर दिवशी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी यांना केला आहे.
या दौर्याच्या तपासणीसाठी अद्ययावत माहिती तयार करणे तसेच पूर्वतयारी करण्यासाठी तसेच १५० दिवस कार्यक्रमांतर्गत कामकाज पूर्ण करण्यासाठी १५ ते १७ या शासकीय सुट्टी कालावधीत जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालये नेहमीप्रमाणे चालू ठेवण्यात यावीत. या दिवशी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहतील याची सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकारी यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना सीईओ जंगम यांनी दिला आहे.
शुक्रवार स्वातंत्रदिवस तसेच शनिवार व रविवार असे तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने अधिकार्यांनी तीन दिवस पर्यटनस्थळ व देवदर्शन दौरा निश्चित केला होता. मात्र विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा दौरा व १५० दिवसांच्या कार्यक्रमामुळे तीन दिवसाची सुट्टी मिळणार नसल्याने अधिकारी व कर्मचार्यांचा हिरमोड झाला आहे.
Post Views: 44