बारामतीतील कृषी प्रदर्शन सध्या चांगलचं गाजतय ते एका फळभाजीमुळे. ती फळभाजी म्हणजे लाल भेंडी.. हो लाल भेंडी.. आतापर्यंत शक्यतो आपण हिरवी भेंडीच खाल्ली आहे आणि बाजारात हिरवीच भेंडी पाहिली आहे. पण बारामतीतील कृषी प्रदर्शनामध्ये असलेली लाल भेंडी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात एडवंटा या कंपनीने देशात पहिल्यांदाच लाल भेंडीचे उत्पादन करणारा पथदर्शी प्रयोग सादर केला आहे. हा प्रयोग सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.पारंपारिक हिरव्या भेंडीपेक्षा या भेंडीला बाजारातही उठाव चांगला मिळणार असल्याचा दावा कृषी अभ्यासक व्यक्त करत आहेत.
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व नवनवीन संशोधनातून शेतीत वेगवेगळी पिके घेतली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होतच आहे. त्याचबरोबर नागरिकांना जीवनसत्व युक्त पालेभाज्या, फळभाज्या, अन्नधान्य मिळत आहे. अशाच प्रयोगातून भेंडीचे नवे वाण बाजारात दाखल झाले आहे. सध्या बाजारात आपणाला हिरवी भेंडी सर्रास पाहिला मिळते. मात्र, भेंडीचे लाल रंगाचे कुमकुम वाण, शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. सामान्य भेंडीपेक्षा या लाल रंगाच्या कुमकुम वाणात शरीराला आवश्यक असणाऱ्या पॉलीक ऍसिड, लोह ,फायबर चे प्रमाण अधिक आहे.
सामान्यतः भेंडी ही हिरव्या रंगाची असते हे सर्वांनाच माहित आहे. परंतु यावर्षी बारामतीतील कृषी प्रदर्शनामध्ये असलेली लाल भेंडी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात एडवंटा या कंपनीने देशात पहिल्यांदाच लाल भेंडीचे उत्पादन करणारा पथदर्शी प्रयोग सादर केला आहे. हा प्रयोग सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.