तभा फ्लॅश न्यूज/अर्धापूर : शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचे तांदूळ वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा धान्यसाठा गोरगरीब कुटुंबांना खाण्यासाठी देण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकारामुळे शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणारे कुटुंब आरोग्य धोक्यात येण्याच्या भीतीत आहेत. नुकतेच एका तहसीलदाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई केली होती. त्याच धर्तीवर पुरवठा विभाग व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने निलंबनाची कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, दाभड येथील काही जागरूक नागरिकांनी तांदळाची तपासणी केली असता निकृष्ट दर्जा स्पष्टपणे दिसून आला. या प्रकरणामुळे दुकानदारांना थेट ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जनतेची मागणी :
संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी.
प्रतिक्रिया :
शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून वाटप होणारे धान्य एवढे निकृष्ट आहे की जनावरेही ते खाणार नाहीत. गोरगरीब कुटुंबांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पुरवठादार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी.