प्रशांत माने : जीवघेणा डॉल्बी भस्मासूर ठरणार असून एकेदिवशी वा कर्णकर्कश्य डॉल्बीचा आपात आपल्यावर अथवा आपल्याच कुटुंब अथवा नात्यातील किंवा आप्तेष्ठांवर झाल्यानंतरच आपले डोळे उघडणार असतील तर यापेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही. डॉल्बीसाठी कायद्याने मर्यादा घालून दिली असली तरी आवाजाच्या मर्यादचे सरर्रासपणे उल्लंघन होते हे कोणीही नाकारू शकणार नाही.
देवी-देवता आणि महापुरुषांच्या सण, जयंती उत्सवात वाजविल्या जाणाऱ्या जीवघेण्या डॉल्बी राक्षसाला वेळीच थोपवले नाही तर आपण नवीन पिढीला काय शिकवतो आहे याचा गांभीयनि विचार करण्याची वेळ आहे. डॉल्बीबाबतच्या कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टिमची तर आहेच, पण सामाजिक कार्यात झोकून देगाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची देखील आहे. नागरिकांचा जीव धोक्यात असल्याने डॉल्बीविरोधात लोकांचा आवाज उठत आहे. तर लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंडळ पदाधिकाऱ्यांची संवेदनशीलता पणाला लागली आहे.
विविध सण, उत्साव आणि महापुरुषांच्या जयंत्या या मोठ्या थाटामाटात सावऱ्या झाल्याच पाहिजेत, याबाबत कोणाचेही दुमत्त असण्याचे कारणच नाही, हे सारे करत असताना समाजाच्या भावना देखील जपणे तितकेच महत्वाचे आहे. कारण एखाद्या गोष्टीची समाजमान्यता कमी होत चालल्यास ते योग्य होणार नाही. मिरवणुका निघाल्या पाहिजेत पण मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्य वाजवणे देखील समाजमनाचा मान राखण्यासाठी गरजेचे आहे. वर्षभरात निघणाऱ्या प्रत्येक मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या विविध मंडजच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्यांनी पुढाकार घेवून जीवघेण्या डॉल्बोला विरोध करणे काळाची गरज बनले आहे. कारण मिरवणुकांमध्ये सहभागी आपल्याच जीवाभावाच्या कार्यकत्यांचा बळी जर डॉल्बीमुळे जाणार असेल तर मग अशा जीवघेण्या आनंदाचा स्वीकार मंडळांचे पदाधिकारी कसे करतील.
आपण ज्या महापुरुषांची जयंती मोठ्या थाटात साजरी करतो, त्या महापुरुषांची शिकवण आचरणात आणण्याची वेळ आज प्रकपनि जाणवत आहे. सामाजिक कार्यात सरसावणाऱ्या विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकत्यांना समाजभान तर आहेच पण ते संवेदनशील देखील आहेत. डॉल्बी नव्हते त्यापूर्वी मिरवणुका निधत नजात्या का? तर नक्कीच निधत होत्या. आजही काही मंडळे पारंपारिक वाद्यांचा वापर करून आनंदात मिरवणुका काडतात आणि मिरवणुकांचा आनंद लुटतात, पूर्वी मिरवणुका पाहण्यासाठो रस्त्यांच्या दुतको अबालवृध्दांची गदर्दी होत होती.
आता देखील गदीं होते, पण त्या गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. कारण मिरवणुकीत वाजविल्या जाणाऱ्या जीवघेण्या डॉल्बीचा आवाज अनेकांना असा होतो. लहान मुले, वयोवृध्दांना या कर्णकर्कश्य आवाजाची भिती बाटते. परंतु सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे आजारी माणसे, दवाखान्यातील उपचार घेणारे रुग्ण यांच्यावर या घातक आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा देखील प्रत्येकानेच विचार करण्याची वेळ आलेली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी कुठे जायने आणि आवाज कसा सहन करायचा हा मोटा गहन प्रश्न आहे. मिरवणूक मार्गावर राहणान्या वयोवध्द, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना या असह्या आवाजाचा किती त्रास होत असेल याबाबत कधीतील आपल्याच घरातील गृहिणींसह सदस्यांना विचारून मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी वाचावत जात्मपरीक्षण करणे आज काळाची गरज आहे.
मिरवणुका काढण्याबाबत अथवा आवाजाची मर्यादा पाहून डॉल्बी वाजविण्याबाबत कोणाचा आक्षेप नाही. परंतु एकदा का मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला अन् आवाजाच्या जोशात नृत्य सुरु झाले की मग बेभान नाचण्याच्या नादात आवाज वाढल्याचे कोणालाही भान रहात नाही. मात्र ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे, अशांना मात्र या कर्णकर्कश्य आवाजाचा मीता पोका असतो. नुकत्याच पार पडलेल्या मिरवणुकीमप्ये एका युवकाला डॉल्वीच्या आवाजाने जीव गमवावा
लागल्याची दुर्घटना ताजी आहे. एखाद्या मोठ्या समुहाला एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे गांभीर्य तितकेसे नसेलही परंतु ज्या आई-वडिलांना आपला मुलगा गमवावा लागतो त्यांच्या हे दुःख डोंगराएको असते. डॉल्वीच्या आवाजाने बळी घेतलेल्या तरुणाचे जर का लग्न झाले असेल तर त्याची पत्नी, मुले यांच्यावर दुःखासह संकटाचा डोंगर कोसळतो, याची कल्पना देखील करवत नाही. ज्या कुटुंबातील व्यक्ती दगावते, त्या कुटुंबांलाच त्या घटनेचे गांभीर्य कळते. कायद्याचे रक्षण करणे हे पोलिस खात्याचे कर्तव्यच आहे, पण कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी तुमच्या-आमच्यासह सर्वांचीच आहे. पोलिस खात्याने देखील डॉब्लीच्या भस्मासूराला वेळीच रोखणे काळाची गरज आहे. पोलिसांनी याबाबत निर्णायक भूमिका घेण्यासाठी राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी पोलिसांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणे गरजेचे आहे. तर लोकप्रतिनिधींना समाजमान्यता असते आणि डॉल्वीवाचत लोकप्रतिनिधींनी त्यांचे लोकदेखील ऐकतात. समाजजागृती केल्यास नक्कीच मंडळांचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते देखील डॉल्बोच्या दुष्परिणामांना ओळखून सकारात्मक प्रतिसाद देतील यात शंका नाही.
आयुक्तांनी तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षकांनी डॉल्बीबाबतच्या कायद्याचे रक्षण प्रकपनि करण्याची वेळ आली आहे. कारण जनतेचा आवाज हा देवाचा आवाज असतो, असे मांटले जाते. डॉल्बीच्या त्रासाबावत आता जनतेतून उठावाला सुरुवात झाली आहे. सहनशील जनता, समंजस्य समाज जोपर्फत शांत असतो तोपर्यंत सर्वकाही आलबेल असते, पण एखादी गोष्ट जनतेने मनावर घेतली तर देवदेखील जनतेच्या आवाजाला साथ देतो. राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासह वर्षभर साजऱ्या होणाऱ्या जयंती मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संवेदनशीलता दाखविण्याची योग्य मेळ हीच आहे.
विना डॉल्बी मिरवणुकांना बक्षिसे
वर्षभर मिरवणुकांचा माहोल असणारे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. मिरवणुकांमध्ये वाजविल्या जाणाऱ्या जीवघेण्या डॉल्बीची घातकता आता सर्वांनाच सक्षात येत आहे. लोकप्रतिनिधी आणि पोलिस खात्यासह समाजातील दानशूरांनी आता विना इॉल्वी मिरवणुका काढणान्या मंडळांना मोठी बक्षिसे, पारितोषिकं ठेवून त्यांना प्रोत्साहन देण्याची आज गरज आहे. पारंपारित वाद्यांसह मिरवणुका काढणारी मंडळे आणि समाजिक संदेश देवून समाजभान जपणाऱ्या मंडळांवर बक्षिसांची बरसात करण्याची गरज आहे. सोलापुरातील सर्व महामंडळे आणि मंडळांनी देखोल कार्यकत्यांचे मतपरिवर्तन करून डॉल्बीमुक्त मिरवुणका अथवा आवाजाबाबत कायद्याची मर्यादा पालनाबाबत पुढाकार घेतला पाहिजे.


























