माळशिरस : माळशिरस पंचायत समितीच्या पंचायत समिती अठरा गणांची सोडत आज काढण्यात आली.उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर तहसीलदार सुरेश शेजुळ व नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.या सोडतीमध्ये अकरा पंचायत समिती गण हे सर्वसाधारण साठी आरक्षीत झाले आहेत त्यामध्ये पाच पंचायत समिती गण हे महिलांसाठी राखीव झाले आहेत तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चार गण आरक्षित झाले आहेत त्यामध्ये दोन गण हे नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहेत तसेच अनुसूचित जातीसाठी तीन गण आरक्षित झाले आहेत त्यामध्ये दोन गण अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले आहेत एकूण अठरा पंचायत समिती गणापैकी नऊ गण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत
पंचायत समितीच्या अठरा गणाचे आरक्षण पुढील प्रमाणे
सर्वसाधारण गण गुरसाळे कन्हेर मेडद वेळापूर यशवंतनगर निमगाव
सर्वसाधारण महिला मांडवे फोंडशिरस लवंग गोरडवाडी व पिलीव हे गण आरक्षित झाले आहेत
नागरिकांच्या मागास प्रवर्गा भांबुर्डी जांबुड हे गण आरक्षित करण्यात आले
नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला संग्राम नगर व तांदुळवाडी हे गण आरक्षित झाले आहेत
अनुसूचित जातीस माळीनगर हा गण आरक्षीत झाले
अनुसूचित जाती महिला दहिगाव व बोरगाव हे दोन गण आरक्षित झाले आहेत
या सोडतीच्या वेळी माझी पंचायत समिती सदस्य रणजीत जाधव, माऊली पाटील, प्रताप पाटील, अजय सकट, मामा पांढरे, लक्ष्मण पवार, बाळासाहेब सरगर, पांडुरंग वाघमोडे, बाबासाहेब माने, श्याम बंडगर, देविदास ढोपे यांच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते ही सोडत अर्णव आडके व स्वरा गुजर या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली