पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विद्यानगर भागात सध्या तिन पिसाळलेल्या कुञयांनी अक्षरश हैदोस घातला असुन या भटक्या पिसाळलेल्या कुञयांनी या भागातील तिन मुलांना चावा घेतला आहे.या भागातील लहान लहान मुले जिल्हा परिषद शाळेत ये जा करतात .त्याच रस्त्यावर या पिसाळलेल्या कुञयांचा वावर आहे .
यामुळे या मुलांना शाळेत पाठवायचे तर कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या कुञयांचा भितीमुळे या भागातील नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे.या पिसाळलेल्या कुञयांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी पिलीव ग्रामपंचायतीचे प्रशासक तसेच ग्रामविकास अधिकारी भंडलकर यांच्याकडे लेखी निवेदनावरे केली आहे.
या निवेदनावर अविनाश मुळे,सिद्धेश्वर पाटील, दिपक गवळी,मंदाकिनी बुगड,कांचन माने,अनिता पाटोळे,महादेव पवार, पुनम वाघमारे,शोभा जरग,रफीक तांबोळी ,गौरी इंगळे यांच्या सह्या आहेत.