नुकत्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत विद्यपीठ विकास मंचाच्या वतीने पदवीधर, प्राध्यापक, प्राचार्य तसेच संस्था चालक अश्या गटामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी बाजी मारली आहे. या निवडणुकी नंतर विद्यापीठाचा सर्वांगिण विकास व येऊ घातलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी व विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी राज्यशासनाने सर्वोतोपरी मदत करावी, विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा.
कौशल्य व गुणात्मक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीयस्तरावर उच्च शिक्षण सोलापूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मिळावे तसेच भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक व सुसज्ज अशी विद्यपीठाची वास्तू लवकरात लवकर विद्यार्थ्यांना खुली व्हावी. विद्यपीठाला विकासासाठी भरघोस निधी द्यावा. आंतरराष्ट्रीय स्तराचे सर्व सोयी सुविधा ने सुसज्ज क्रीडांगण व क्रिकेट मैदान उभारावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय अद्यासन केंद्र विद्यापीठात सुरू व्हावे. तसेच विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृतीचे अनवरण करण्यासाठी वेळ घ्यावा अशी विनंती करण्यात आली. त्याच सोबत विद्यापीठ विकास मंचाच्या शिष्ठ मंडळाने भेट घेऊन विविध शैक्षणिक व विद्यापीठ विकासाच्या विषयांवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी विद्यपीठ विकास मंचाचे प्रदेशअध्यक्ष मा.श्री.नारायणराव पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य मा.श्री.प्रा.देवानंद चिलवंत,विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य मा.श्री.मोहन डांगरे, तसेच अभाविपचे प्रदेश सहमंत्री रोहित राऊत उपस्थित होते.