Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार – पू. बाबूसिंगजी महाराज

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 25, 2023
in maharashtra
0
तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार  – पू. बाबूसिंगजी महाराज
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जामनेर- अ. भा.हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाची आज २५ जानेवारी पासून सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर पू. संत बाबूंसिंग महाराज (मुख्य गादीपती पोहरागड), मा. शरदराव ढोले अ. भा. धर्म जागरण प्रमुख, पू. महामंडलेश्वर गुरू शरणानंद महाराज, पू. संत गोपाल चैतन्य महाराज, संत सुरेश महाराज, संत देनाभगतजी महाराज, संत यशवंत महाराज, संत जितेंद्रनाथ महाराज, आचार्य साहेबराव शास्त्री, महंत संग्रामसिंग महाराज, संत रायसिंग महाराज आदी संत व्यासपीठावर उपस्थित होते. आठ राज्यात ११ हजार तांड्यावर प्रत्यक्ष संपर्क केल्यावर असे लक्षात आले की ३ हजार तांड्यावर ख्रिस्ती मिशनरीकडून बंजारा बांधवांचे धर्मांतर झाले आहे. त्या सर्व बांधवांना पुन्हा सनातन हिंदू धर्मात परत आणणार आहोत. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज जागृत करण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी कुंभ आयोजित असल्याचे पू. संत बाबूसिंगजी महाराज यांनी सांगितले. धर्म सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी मंचावर असलेल्या श्री बालाजी भगवान, गुरुनानक देवजी साहेब, भारत माता आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.
यावेळी अ.भा. धर्मजागरण चे प्रमुख शरदराव ढोले यांनी मार्गदर्शन करतांना देशाचे वैभव पाहून परकीय आक्रमणे झाली. ज्या ग्रीकांनी आक्रमण केले होते ते हिंदू झाले. इस्लामचे आक्रमण वेगळे होते. ते क्रूर होते तलवारीच्या जोरावर लाखो लोकांचे धर्मांतरण त्यांनी केले. इसाई द्वारा छल , कपट आणि सेवेच्या माध्यमातून धर्मांतरण सुरु झाले. हे धर्मांतरण पूजा पद्धती पुरते मर्यादित न राहता वेगळे राज्य आणि वेगळा देशाच्या मागणीने सुरु झाले. पूर्वांचल मध्ये ७ पैकी ४ राज्यांमध्ये ख्रिस्तीकरण झाले. ११ हजार बंजारा तांड्यापैकी ३ हजार तांड्यांचे धर्मांतरण झाले आहे. बंजारा समाजाचे धर्मांतरण होऊ नये यासाठी तसेच धर्मांतरण थांबविण्यासाठी शेकडो संत येथे आले असल्याचे त्यांनी सांगतिले.

संत गोपाळ चैतन्य महाराज यांनी आपल्या आशीर्वचन करताना कुंभात सर्व महापुरुषांना आमंत्रित केले आहे. संत समाज धर्म रक्षणाचे काम करतो. ३ हजार गावात धर्म परिवर्तन झाले आहे म्हणून कुंभाची गरज पडली आहे. हिंदू समाजात जागृती होण्यासाठी आणि धर्म रक्षणासाठी हा कुंभ आहे असे सांगितले. संत बाबूसिंग महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात बंजारा समाजाच्या कुंभात मथुरेहून संत उपस्थित राहिले आहेत. कर्नाटक , महाराष्ट्र , गुजरात आदी राज्यातील समाज आणि संत कुंभात सहभागी झाले आहेत. गोर बंजारा व लबाना नायकडा समाजात महान संत घडून गेले आहेत. समाज संघटित होण्यासाठी हा कुंभ आहे. भक्ती मार्गातून दिशा मिळते. समाजाला जागृत करण्यासाठी संत व्यासपिठावर उपस्थित झाले आहेत. बंजारा समाजाचा प्रथम कुंभ गोद्री येथे होत असून हा ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. संत सुरेश महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात भारत मातेला आपण माता म्हणतो. आम्ही सनातनी आहोत आणि सनातनी राहू. सीमेवर सैनिक देश आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी उभा असतो तर धर्मासाठी संत समाजात उभे असतात असे त्यांनी सांगितले. तर पू. महामंडलेश्वर शरणानंद महाराज यांनी प्रतिपादन करतांना बंजारा समाज हा व्यापक आहे. हा समाज व्यापारी होता. बंजारा समाज देशभर पसरलेला असून धार्मिक आहे. संत हाथिराम बाबा हे तिरुपती बालाजी यांच्या सोबत चौकट खेळत असत त्यामुळे बालाजी भगवान आणि हातीराम बाबा आपले श्रद्धास्थान आहेत असे सांगत त्यांनी उपस्थितांन आध्यात्मिक मार्गदर्शन केले.

धर्म सभेतील क्षण चित्रे
व्यासपीठावर संतांचे स्वागत महिलांनी पारंपरिक पोषाखात गोरमाटी भाषेत गीत गात स्वागत केले. शाहीर सुरेश जाधव यांनी आपल्या सहकार्यांसोबत “वीर लखीशहा बंजारा ” यांचा पोवाडा सादर केला.जगदंबा देवीचा गोंधळही व्यासपीठावर सादर करण्यात आला.

Post Views: 116
Previous Post

सोलापूर:- विद्यापीठ विकास मंचाच्या शिष्ठ मंडळाने चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

Next Post

तिरुपतीचे दर्शन घेऊन परतताना जुळे सोलापूरातील चार तरुणांचा जागीच मृत्यृ तर चौघे गंभिर जखमी…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
तिरुपतीचे दर्शन घेऊन परतताना जुळे सोलापूरातील चार तरुणांचा जागीच मृत्यृ तर चौघे गंभिर जखमी…

तिरुपतीचे दर्शन घेऊन परतताना जुळे सोलापूरातील चार तरुणांचा जागीच मृत्यृ तर चौघे गंभिर जखमी...

ताज्या बातम्या

पालिकेच्या 47 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा दंड

April 22, 2026

बालमाता प्रकरणी आत्तापर्यंत 34 घटना उघड

April 22, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांनी पूनम गेट समोर केली निदर्शने

April 22, 2026

रुग्णांचा अर्ज आल्यावर सहायता निधीला आठ तासात मिळणार मंजुरी

April 22, 2026

अमोल शिंदे चेतन नरोटे यांच्या निलंबनानंतर पुढच्या सभेत होणार सहभागी

April 22, 2026

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या पत्नीचा सात दिवसानंतर झाला मृत्यू

April 22, 2026

पारध येथील दोन युवकांची उल्लेखनीय कामगिरी ; पोलीस व मनपा सेवेत निवड

April 22, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

April 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0823635

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697