मंगळवेढा – मंगळवेढ्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसा मुळे नुकसान झाले आहे.दरम्यान आनुदान दिवाळीला देऊन शेतकर्याची दिवाळी गाेड केली जाईल आश्वासन शासनाने दिले आज आखेर आनुदान शेतकर्याला न मिळाल्याने त्यांनी काळी दिवाळी साजरी केली.याचा काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त करीत मंगळवेढा तहसिल कार्यालयासमाेर पिठल ठेचा भाकरी खाऊन निषेध आंदाेलन केले.
मंगळवेढा तालुक्यामध्ये संततदार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे भरपूर पिकाचे नुकसान झाले. अनेकांची घरे पडली, ढवळस मध्ये एका मुलाचा अंगावर भिंत पडून मृत्यू ही झाला शेतकऱ्यांनी फार मोठ्या कष्टाने पिके जाेपासली मात्र ती मातीमोल झाली. तसेच नदीकाठच्या गावांना नदीमध्ये सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे व संततदार मुळे फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले मंगळवेढा ज्वारीचे कोठार म्हटले जाते या ज्वारीच्या कोठारात काळी जमीन असल्याने भरपूर पाऊस पडल्यामुळे हा हंगाम वाया जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .कारण अजून जमिनीमध्ये पाणी असल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी उभ्या पिकामध्ये, उसामध्ये पाणी आहे अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली पण ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे जी मदत जाहीर झाली ती मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग दिवाळीला करून शेतकर्याची दिवाळी गाेड केली जाईल आसा शब्द सरकारन दिला हाेता मात्र साेमवार पर्यंत ऐक रूपडाही खात्यावर शेतकर्यांच्या जमा झाला नाही. .
खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सरकारच्या मदतीची वाट न पाहता अतिवृष्ट भागांमध्ये दौरा करून स्वतः मदतीचा हात पुढे केला, सरकारने शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही मदत दिली नाही*तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही म्हणून मंगळवेढा तालुका शहर काँग्रेस तर्फे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दूपारी दीपावलीच्या पहिल्या दिवशी पिठलं भाकरी ठेचा खाऊन काळी दिवाळी तहसील कार्यालयासमोर साजरी केली आहे.
यावेळी मंगळवेढा मंडळ अधिकारी धनंजय इंगोले यांनी सदरचे निवेदन स्वीकारले यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अँड.नंदकुमार पवार, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन पाटील, प्रदेश सचिव रवीकिरण कोळेकर, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष राहुल घुले ,मतदारसंघाध्यक्ष मारुती बापू वाकडे, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार मेथकुटे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, महादेव कोळी, मुबारक शेख ,मनोज माळी , महिला शहराध्यक्ष आयेशा शेख, पंडित पाटील ,अभिमान बेद्रे रवींद्र शिवशरण, समाधान शिरसट, निसार पटेल, राजेंद्र पुजारी, विनायक कोकरे, संतोष कवले ,आबा पाटील ,विजय सांगोलकर ,सुनील खरात ,किसन अमुंगे ,बिरा पुजारी, मारुती डोके, सुनिता अवघडे, बापू अवघडे ,महादेव साखरे ,सुधाकर कांबळे, कादर पटेल ,अशोक कांबळे व आन्य कार्यकरते माेठ्या संख्येने उपस्थित होते.
फाेटाे ओळी, मंगळवेढा तहसिल कार्यालयासमाे आंदाेलन करताना काँग्रेसचे पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहे.