नवी दिल्ली – सणासुदीच्या विशेष काळात देशभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. छठ सणापूर्वी प्रवासात वाढ होत असताना, प्रत्येक प्रवासी सुरक्षित आणि आरामात त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचावा यासाठी रेल्वे अतिरिक्त प्रयत्न करत आहे. नियमित रेल्वे सेवांव्यतिरिक्त, पुढील पाच दिवसांत दररोज सरासरी 300 विशेष गाड्यांसह 1500 विशेष गाड्या चालवल्या जातील. कार्यक्षम व्यवस्था, सुधारित प्रवासी सेवा आणि सुविधा आणि प्रवाश्यांची योग्य काळजी घेण्याच्या वचनबद्धतेसह, भारतीय रेल्वे उत्सवाच्या काळात प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान चांगली सेवा मिळेल याची खात्री करत आहे.
नियमित गाड्यांव्यतिरिक्त, गेल्या 21 दिवसांमध्ये 4,493 विशेष गाड्या, म्हणजेच दररोज सरासरी 213 फेऱ्या वाढविल्याने, प्रवाशांना दिवाळीच्या उत्सवासाठी सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचण्यास मदत झाली. या वर्षी येणाऱ्या छठ पूजा आणि दिवाळी हंगामासाठी, भारतीय रेल्वे प्रवाश्यांची गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी एक मजबूत आणि विशेष रेल्वे वेळापत्रक चालवत आहे. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या 61 दिवसांच्या कालावधीत, देशभरात 12,000 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
Date
Trips
21-10-2025
282
22-10-2025
285
23-10-2025
295
24-10-2025
303
25-10-2025
311
26-10-2025
305
27-10-2025
286
28-10-2025
242
29-10-2025
242
30-10-2025
263
31-10-2025
263
आतापर्यंत, एकूण 11,865 फेऱ्या (916 गाड्या) अधिसूचित करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 9,338 आरक्षित आणि 2,203 अनारक्षित फेऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 7,724 पूजा आणि दिवाळी विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या त्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे, जे सणासुदीच्या काळात सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेची निरंतर वचनबद्धता दर्शवते.