बार्शी – पांगरी येथे गेल्या आठ दिवसांपासून पांगरी गावात एक माकड सतत वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या माकडाने चार ते पाच लहान मुलांना चावा घेतल्याची घटना घडली होती. तत्काळ त्या मुलांना हॉस्पिटलमध्ये नेऊन लसीकरण करण्यात आले.
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पांगरी येथील डॉ. विलास लाडे यांनी वन परिमंडळ अधिकारी आरजू पिरजादे यांच्याशी संपर्क साधून माकडाचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्यानंतर सोलापूर येथील वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
रेस्क्यू टीमने दोन दिवस प्रयत्न करुन मंगळवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता पांगरी येथे आलेल्या माकडाला पिंजऱ्याच्या आणि जाळीच्या सहाय्याने सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळविले. नंतर त्या माकडाला रामलिंग डोंगर परिसरात सोडण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने अलका करे, वन परिमंडळ अधिकारी रेशमा पिरजादे, वनरक्षक पांगरी खेने मॅडम, रेस्क्यू टीम सोलापूर कृष्णा निरवणे, प्रवीण जेऊरे, वाहचालक सिद्धेश्वर जाधव, वनमजूर सुधाकर चौधरी, ज्ञानेश्वर आपुने, ललीत वस्ताद यांच्या टीमने या कारवाईमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. पांगरी ग्रामस्थांच्यावतीने या सर्व अधिकाऱ्यांचे व रेस्क्यू टीमचे अभिनंदन करण्यात आले.


















