बार्शी – बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय साळुंके यांनी आयोजित बार्शी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी संवाद मेळावा बार्शी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव, बार्शी विधानसभा प्रभारी पांडुरंग कुंभार यांनी उपस्थित राहून पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवाडी, बार्शी तालुकाध्यक्ष सतीश पाचकुडवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वसिम पठाण, युवक विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के, युवक शहराध्यक्ष संतोष शेट्टी, शहर सचिव अजित कांबळे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष रंजना साळुंखे, महिला शहराध्यक्ष सोनाली जगजाप, बप्पा सुतार, महेश जगताप, ख्वाजा तांबोळी, यश बागल, फैजान जिकरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेवेळी सचिव तथा बार्शी तालुका प्रभारी पांडुरंग कुंभार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून नगरसेवक निवडून सर्वसामान्य जनतेला आपला हक्काचा सर्वसामान्य नगरसेवक निवडून आणायचा आहे आणि यासाठी काँग्रेसने ताकतीने निवडणुकीत उतरावे, असेही सूचना केल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सोबत लढायचे किंवा स्वतंत्र निवडणूक लढवायचे याबाबत आपण आपल्या स्तरावरुन निर्णय घेऊन आम्हाला कळवावे. परंतु आपण पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढवणार आहोत याची तयारी सुरु करावी. तसेच फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाही तर पुढील विधानसभेचा आमदार काँग्रेस पक्षाचा असणार आहे, अशी ठामपणे सांगितले. तसेच पूर्ण ताकतीने काँग्रेस पक्षाचे काम करुन संघटन वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.


















