धाराशिव / लोहारा – लोहारा शहरातील जुने तलाव येथे बंद असलेले नाना – नानी पार्क व शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बंद असलेले नगर पंचायत इमारतीचे काम मागील दिड ते दोन वर्षापासुन बंद असलेले दिसून येत आहे. संबंधित कंत्राटदार यांच्यािकडुन शासनाकडुन देण्यात आलेल्या नियम अटी व शर्तीचे पालन होत नसुन संबंधित ठेकेदार हा मनमर्जीने कामकाज करत असल्यााचे निदर्शनास येत आहे. कंत्राटदार हा अंदाजपत्रकानुसार काम करतो का याची शहानिशा करण्या्त यावी. नगर पंचायत अधिकारी व पदाधिकारी यांनी कामे चालु करण्यारसाठी कुठलीही हालचाल केली नाही. संबंधित कंत्राटदारास मुदतवाढ देऊन उलट अभय देण्या चे काम नगर पंचायतने केले आहे.
संबंधित कंत्राटदारास मुदतवाढ देऊन दोन महिने झाले तरी ही कंत्राटदार काम करण्या स तयार नसुन यापुढे कुठल्याधही प्रकारची मुदतवाढ देण्या त येऊ नये व शासनाच्यात दिलेल्याा अटी व शर्तीचे उल्लंढघन केल्या्प्रकरणी त्यावच्याोवर योग्ये ती कार्यवाही करावी.
तसेच संबंधित कंत्राटदाराने नाना-नानी पार्क व नगर पंचायत इमारत याचे काम येत्याय 15 दिवसात चालु नाही केल्यास त्या ला काळ्या यादीत टाकण्यागत यावे. अन्ययथा राष्ट्र वादी कॉग्रेस पार्टी लोहारा शहर यांच्या वतीने आमरण उपोषण करण्याात येईल असे निवेदन मा उपगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी मुख्याधिकारी लोहारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




















