Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

२०४७ ला स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करताना भारत एक विकसित देश असेल : अ‍ॅड. आशिष शेलार

तरुण भारतbyतरुण भारत
November 4, 2025
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व कुशल नेतृत्वात भारत प्रगतीच्या दिशेने मार्गोत्क्रमण करत आहे. त्यामुळे ज्यावेळी १५ ऑगस्ट २०४७ साली आपण आपल्या देशाचा शतक महोत्सव साजरा करताना भारत एक विकसित देश म्हणून जगासमोर आलेला असेल असे प्रतिपादन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले. लातूरच्या केशवराज विद्यालयात मंगळवारी सकाळी वैकुंठ चतुर्दशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भगवद्गीता सामूहिक पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी अ‍ॅड. शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख, संजय गुरव,स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शैलेश कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या समोर श्रीमदभगवद्गीतेच्या १२ व्या आणि १५ व्या अध्यायाचे सामूहिक पठण केले. केशवराज विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल राज्याचा सांस्कृतिक मंत्री या नात्याने शासनाच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो असे सांगून अ‍ॅड. आशिष शेलार पुढे म्हणाले की, गुरुजन आणि आई - वडील यांच्याकडून मिळालेल्या संस्काराने विद्यार्थी समृद्ध बनतात. संस्कार हे छोट्या छोट्या गोष्टीतून घडत असतात. आजचे जग माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे विज्ञानाची भाषा शिकण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या संस्काराची वीण मजबूत असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदींनी श्रीमद्भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित केला आहे. आज आपण केशवराजमध्ये विद्यार्थ्यांचे सामूहिक श्रीमदभग्वदगीता पठण ऐकून उद्याची पिढी, उद्याचा भारत कसा असेल हे बघायचे असेल तर लातूरच्या केशवराज विद्यालयात जाऊन बघा, असे प्रत्येकाला आवर्जून सांगणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वंदेमातरम गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण सरदेशमुख यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मागच्या तीन वर्षांपासून विद्यालयात श्रीमदभग्वदगीता पठणाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून केशवराज विद्यालय हे मराठवाड्यातील गुणवंतांची खाण असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका राजश्री कुलकर्णी यांनी केले.

संगीत शिक्षक संतोष बीडकर यांच्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, केंद्रीय विद्यासभा संयोजक तथा उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, रेनीसन्स सीबीएसई स्कूल शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. मनोज शिरूरे, केशवराज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विभाग प्रमुख रेखा पुरी, केशवराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे, केशव शिशु वाटिका प्रधानाचार्या अवंती कुलकर्णी, संपत पाटील, सुधीर धुतेकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, विद्यासभा संयोजक तथा उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक राजश्री कुलकर्णी, इंदू ठाकूर, अंजली निर्मळे, राम जोशी, धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासपूरक मंडळ प्रमुख रेणुका गिरी, सहप्रमुख मीरा चामवाड, शैला कुलकर्णी, कांचन तोडकर व व्यवस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 39
Previous Post

समाजाचे दर्पण म्हणजे भारतीय साहित्याचे निर्माते प्रेमचंद होत – प्रा अनिल चवळे

Next Post

नगर पंचायत हद्दीतील कामे तात्काळ करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका – आयुब शेख

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नगर पंचायत हद्दीतील कामे तात्काळ करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका - आयुब शेख

ताज्या बातम्या

जाहिरात जगतातील पत्रकार मित्र संदीप झवेरी यांचे निधन

April 24, 2026

डॉ. मीनश सी. शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

April 24, 2026

सानिया तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड

April 24, 2026

कुंभारी येथे बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन

April 24, 2026

दावतपूर गावात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 24, 2026

त्या बाई वाट्टेल तस बोलल्या …

April 24, 2026

दासरी गद्दार त्यांना हाकला

April 24, 2026

मंगरूळ मध्ये सेवका विरोधात कडक कारवाईची मागणी

April 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0827983

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697