वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त पुणे आणि अनेक गावाहून येणाऱ्या स्वामी समर्थ भक्तांना वळसंग नागरिकाकडून जेवणाची व अल्पपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. श्री शंकरलिंग मंदिरात लिंगराज दुधगी,रमेश दुधगी,श्री शांकरलिंग तरुण मंडळ यांच्याकडून तर श्री सिद्धेश्वर मंदिरात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, श्री सिद्धेश्वर प्रतिष्ठान कडून रात्री जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
स्वामी भक्तांनी पहाटे स्नान करून अक्कलकोट कडे रवाना होत असताना सकाळची नाश्ता व चहाची व्यवस्था राज ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे अध्यक्ष नागराज कोंडे, योगेश चनशेट्टी,सिध्दाराम सुरपुरे,पंचाक्षरी स्वामी,सलीम तांबोळी, प्रशांत देगाव,विश्वनाथ भूसणगी, सुरज चनशेट्टी,बंडू शिरासंगी ,देवेंद्र शिंदे व इतर सहकारी मित्र मंडळातून करण्यात आले.























