नांदेड – नांदेड दक्षिण (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गणेशराव मोरे,नांदेड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे,लोहा (उबाठा) मा.तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यांनी आज शिवसेना उपनेते तथा मंत्री विधानपरिषद गटनेते आमदार ना.हेमंतभाऊ पाटील यांच्याहस्ते व आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी विनय गिरडे, दत्तात्रय पईतवार, बाळासाहेब पाटील कऱ्हाळे, बिल्लु यादव, अशोक मोरे, सुहास खराणे पाटील, मिलिंद पवार,बाळासाहेब पावडे,बाळासाहेब देशमुख, सचिन किसवे,बालाजी पाटील भायेगावकर,माऊली मोरे,सदाशिव पुंड,अनिल हंबर्डे,संभाजी जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी यांची उपस्थित होती.




















