अक्कलकोट – वटवृक्ष निवासी दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्यातून अनेकांना भक्तीमार्गात आणले. त्यांच्या अतुलनीय लीलांमुळे अनेक भाविकांना भक्तीचे महत्व कळाले.
श्री स्वामी समर्थाच्या या जागृत कार्याचा विस्तार श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन व अक्कलकोट संस्थान व राजघराण्याचे मानकरी महेश इंगळे यांनी आपल्या स्वामी सेवेतून धर्मप्रबोधन अधोरेखीत करीत श्री स्वामी समर्थांच्या कार्याचा जागृत वसा अखंड तेवत ठेवला आहे, म्हणून श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे धार्मिक कार्य धर्मप्रबोधनास चालना देणारे कार्य असल्याचे मनोगत कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे मा.सभापती तथा गोकुळ दुध संघाचे संचालक व कागल संस्थानचे राजे अंबरीषसिंह घाटगे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सहकुटूंब भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी राजे अंबरीषसिंह घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मा.सदस्या सुयशा घाटगे, चि.विरेन घाटगे, रणजीत यादव सरकार यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी राजे अंबरीषसिंह घाटगे बोलत होते. पुढे बोलताना राजे अंबरीषसिंह घाटगे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्याची धुरा भविष्यातही अनेक वर्षे अखंडे वाहण्याची प्रेरणा महेश इंगळे यांना लाभावी याकरीता श्री स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले आहे. आज अगत्य पुर्वक श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाचा विशेष लाभ आम्हा घाटगे कुटूंबियाना उपलब्ध करुन दिल्याबद्दल व मंदीर समितीच्या वतीने आमचा सन्मान केल्याबद्दल आपण महेश इंगळे यांचे अत्यंत ऋणी असल्याचे मनोगतही व्यक्त केले.
यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विनायक जाधव, किणीचे सरपंच मिथुन जाधव, सामाजिक कार्यकर्ता आयाज जमादार, शिवसेना अल्पसंख्यांक तालुका प्रमुख बाबासाहेब सोनकांबळे, प्राध्यापक शेखर जैनजांगडे, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे व भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – राजे अंबरीषसिंह घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुयशा घाटगे, चि.विरेन घाटगे, रणजीत यादव सरकार यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, विनायक जाधव, किणीचे सरपंच मिथुन जाधव, सामाजिक कार्यकर्ता आयाज जमादार व अन्य दिसत आहेत.


























