Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

क्रिकेटपटूंच्या मनोबल वृद्धिसाठी योगाभ्यासाचा आरंभ

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in sports
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्रात प्रथमच योग प्रशिक्षण आयोजित सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सर्व क्रिकेटपटूंच्या मानसिक व भावनिक खंबीरतेसाठी  योगाभ्यास सुरु करण्याचा निर्णय सर्व पदाधिका-यांतर्फे एकमताने घेण्यात आला.

या निर्णयाला अनुसरुन रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्टस व योग संस्थेच्या प्रधान संचालिका तसेच पु.अ.हो. विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र संकुलातील ‘योग’ विषयातील पदव्युत्तर पदवीधारक आणि गीतापरिवारच्या सर्व कल्याण योग विभाग प्रमुख योगाचार्या संगीता सुरेश जाधव यांना नुकतेच असोसिएशन तर्फे आमंत्रित करण्यात आले. आरंभिक चर्चेनुसार क्रिकेटपटूंना क्रमशः टप्प्या टप्प्याने योगतंत्रं शिकवण्याचे ठरले असून सुरुवातीला चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाला व्यवस्थापक निलेश गायकवाड व पालकांच्या उपस्थितीत तत्काल “प्रारंभिक योग प्रशिक्षण” देण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर क्रिकेट असोसिएशनने हे पाऊल पहिल्यांदा उचलले असून त्यासाठी जिल्हा सचिव चंद्रकांत रेंबर्सू व १४ वर्षाखालील सिलेक्शन कमिटी चेअरमन राजेंद्र गोटे यांची एमसीएच्या वतीने व डिस्ट्रिक्ट चेअरमन रणजितसिंह मोहिते- पाटील, व्हा. चेअरमन श्रीकांत मोरे, अध्यक्ष दिलीप माने, संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील व उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव, नितीन देशमुख, खजिनदार संतोष बडवे यांचेतर्फे प्रशंसा करण्यात आली आहे.

——

प्रारंभिक प्रशिक्षण

अतिशय वेगाने पण ठाम निर्णयाने आयोजित प्रारंभिक योग सत्रामधे सुरुवातीला जिल्हा सचिव चंद्रकांत रेंबर्सू व टुर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे यांनी संगीता सुरेश जाधव यांचे स्वागत केले. गोटे सरांनी परिचय करुन देत, एकाग्रता संदर्भात काही ऐतिहासिक प्रसंग सांगून विषयाचे प्रास्ताविक केले.

—–

आसन, प्राणायाम,  प्रत्याहार, धारणा, ध्यानाच्या प्रारंभिक योगतंत्रांनी आरंभ

युद्ध व योगाचार्या संगीतादीदींनी मार्गदर्शन करताना कोणतीही शारीरिक क्रिया करण्यापूर्वी मन व बुद्धीला का प्रशिक्षित करावे लागते , हे सोप्या भाषेत समजावून सांगून योगाभ्यासाचे महत्व परस्पर संवादातून विशद करत स्नायूंच्या लवचिकतेसाठी काही आवश्यक योग आसने करवून घेतली. त्यानंतर रक्ताभिसरण व प्राणक्रीयेचे विवेचन करत शास्त्रोक्त दीर्घश्वसन क्रीया करवून घेतली. यानंतर सौम्य व तीव्र भस्त्रिका शिकवून भ्रामरी गुंजन तसेच ॐ कार नादध्वनिचे महत्त्व स्पष्ट करत कमीत कमी जागेत व कमी वेळात धारणेतून ध्यानाचा सराव करत या योगतंत्रांचा तत्काल अधिकाधिक लाभ  कसा करवून घ्यायचा याचे प्रशिक्षण दिले.

—–

खेळाडूंच्या मनोबल व बुद्धीच्या सुयोग्य क्रीयान्वयासाठी योगाभ्यासाचे फायदे

१. मानसिक व भावनिक स्थिरता व एकाग्रतेसाठी

२. चंचलता नष्ट करुन तत्काल व योग्य निर्णय घेण्यासाठी

३. प्रसंगावधान राखून चिंता सोडून झटपट हालचाल करण्यासाठी

४. नैराश्य दूर करुन उत्साह वाढविण्यासाठी तसेच आळस झटकून अधिक आत्मविश्वासाने कियान्वित होण्यासाठी

५. भय, शीघ्रकोप पळवून लावून , शरीरांतर्गत ऊर्जा वाढवून त्वरित एकाग्रता साधून अधिक वेळ सक्रीय राहण्यासाठी

सदर योगतंत्रं व प्रगत अभ्यास खेळाडूंना संतुलित, सफल व विजयी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो, असा अनुभव अनेक खेळाडूंसह कराटेपटूंना गेल्या पाच वर्षात शहर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत जिंकण्यासाठी व भारत देशाचे नाव  जागतिक क्रमवारीत उच्चस्थानी पोहोचवण्यासाठी तसेच हार जीत प्रसंगी मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आला असल्याचे कराटेपटू भुवनेश्वरी व अन्य खेळाडूंची उदाहरणं देत संगीता जाधव यांनी क्रिकेटपटूंच्या मनावर योगाभ्यासाचे महत्व बिंबवले.

——

भावी योजना- प्रज्ञासंवर्धन

ब्रह्मलीन योग व युद्धाचार्य सुरेश जाधव यांनी चाळीस वर्षांच्या अनुभव व योग साधनेतून ‘सर्व कल्याण योग – स्काय’ अंतर्गत तयार केलेला “प्रज्ञासंवर्धन योग” हा कमीत कमी वेळेत मन व बुद्धी संवर्धन तसेच ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढविणारा प्रगत प्राणायाम अभ्यास लवकरच सर्व वयोगटातील क्रिकेटपटूंना शिकवणार असल्याचे व महाराष्ट्रात प्रथमच असे मनाचे सामर्थ्य वाढविणारे योग प्रशिक्षण योग साधक मिहिर व संगीता जाधव यांच्या सहयोगाने देणार असल्याचे सचिव श्री. रेंबर्सू यांनी याप्रसंगी सांगीतले.

Post Views: 44
Previous Post

श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे धार्मिक कार्य धर्मप्रबोधनास चालना देणारे – राजे अंबरीषसिंह घाटगे

Next Post

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट!

ताज्या बातम्या

गुप्तधन मिळवून देतो म्हणून महिलेची केली फसवणूक

April 17, 2026

अल्पवयीन मुलीचे गुपचूप केले लग्न गरोदरपणामुळे फूटले बिंग

April 17, 2026

ऊन वाढला शेतीसाठी पाणी द्या पालकमंत्र्यांनी घेतली ऑनलाइन बैठक

April 17, 2026

सावधान ! शाळांना लागणार आता लगाम

April 17, 2026

बापरे सोलापुरात उन्हाचा तडका वाढतोच आहे

April 17, 2026
महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

आरती सोनवणे यांची न्यायाधीश पदी निवड

April 17, 2026

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0814496

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697