सोलापूर – शालेय रेकॉर्डमध्ये अनेकवेळा विद्यार्थ्यांच्या नावात किंवा जन्मतारखांमध्ये चुका असतात. पहिली ते दहावीपर्यंतच नावात किंवा शाळेच्या रेकॉर्डमध्ये बदल करता येतो. त्यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल करून त्यास मंजुरी मिळणे गरजेचे आहे. दहावी व बारावी परीक्षेच्या बोर्ड प्रमाणपत्रावर आलेले नाव शेवटपर्यंत कायम राहते. त्यामुळे शाळांच्या प्रमाणपत्र व दाखल्यावरील दुरूस्ती करण्यासाठी पालक व विद्यार्थी वारंवार शिक्षणाधिकारी कार्यालयाला चकरा मारतात. मात्र अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे दुरूस्तीऐवजी मनस्ताप सहन करावे लागते. शिक्षण विभागाच्या मंजुरीशिवाय त्यामध्ये मुख्याध्यापकांना बदल करता येत नाही. नाव, स्फेलिंग, प्रमाणपत्र व विविध दुरूस्तीच्या ७०० प्रस्तावांना शिक्षणाधिकारी कार्यालयाला मंजूरी दिल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनि दुरूस्ती प्रस्तावांना प्राधान्य देऊन पालक व विद्यार्थ्यांचा त्रास कमी केला आहे. शैक्षणिक नोंदीमधील अडचणी दूर केल्या केल्याने विद्यार्थी व पालकांमधून शिक्षणाधिकार्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
आधारकार्ड व जन्मदाखल्यावर वेगळे नाव, जन्मतारखेत चुका, नावाच्या अक्षरात मागेपुढे, स्पेलिंगमध्ये बदल, काना-मात्रा वेगळा, वडिलांच्या नावात बदल, जन्मतारखेतील महिना वेगळा, तारीख वेगळी, आडनावात चुका चुका शाळा व पालकाकडून झालेले असतात.
शैक्षणिक कागदपत्रातील चुकांमुळे अडचण निर्माण होऊ नये यासाठी विद्यार्थी व पालक जन्मदाखल्याप्रमाणेच नाव व जन्मतारीख व्हावी यासाठी शाळेकडे हेलपाटे मारतात. शाळेकडून कागदपत्रासह प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर केला जातो. त्या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर मुख्याध्यापक आपल्याकडील रेकॉर्डवरील नावात व जन्मतारखेत बदल करतात.
….
….
शाळेच्या कागदपत्रांमध्ये चुका व बदल असल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात त्रास सहन करावे लागते. त्यामुळे नावात व जन्मतारखेत बदलाचे ७०० हून अधिक प्रस्ताव दाखल झाले होते. कागदपत्रांची पडताळणी करून पंधरा दिवसात ७०० प्रस्ताव मंजूर केले आहेत. यामुळे विद्यार्थी व पालक यांचे वेळ व पैशाची बचत होणार आहे. पालकांनी, शाळांनी माध्यमिक शिक्षण विभागातून हे मंजुरी आदेश तातडीने घेऊन जावेत.
सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर.
….
शिक्षणाधिकार्यांचे कौतुकास्पद काम
…,
शाळांच्या दप्तरमध्ये पालक व विद्यार्थी यांच्या नजरचुकीमुळे चुका झालेले असतात. त्यांची दुरूस्ती करून घेण्यासाठी दहावी व बारावीपर्यंत संधी असते. असे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी १५ दिवसात ७०० प्रस्ताव मंजूर करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे काम कौतुकास्पद आहे.
सुनिल व्हनमाने, अध्यक्ष, पालक संघ, मंद्रूप


















