पंढरपूर – येथील उमा महाविद्यालया मध्ये आविष्कार महोत्सव २०२५ महाविद्यालय स्तरावर संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य,संस्थेचे विश्वस्त डॉ.मिलिंद परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना,”आविष्कार या शब्दामध्ये सकारात्मकता आहे. संशोधकाकडून जे संशोधन केले जाते ते समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी असावे प्रत्येकामध्ये सुप्तावस्थेत संशोधक असतो अशा आविष्कार महोत्सवातून विद्यार्थ्यांमधील संशोधक जागा झाला पाहिजे असे प्रतिपादन केले.”
या कार्यक्रमाचे परीक्षक प्रा.डॉ.चंद्रकांत काळे यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार संशोधन हे अंतरविद्याशाखीय पद्धतीने झाले पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी कौशल्य निर्माण होते.असे विचार विशद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धीरजकुमार बाड यांनी या कार्यक्रमाप्रसंगी संशोधन हे मूलभूत व उपयोजित स्वरूपाचे असून ते कौशल्य विकासा बरोबरच आत्मनिर्भर करणारेही असावे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रो.डॉ.गोविंद भोसले यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.दत्ता सरगर यांनी केले. आभार आय क्यू एसी कॉर्डिनेटर प्रा.डॉ.अविनाश देशपांडे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी परीक्षक डॉ.आर.एम.शेख, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.जे.एस.बागवान, आविष्कार महोत्सवाचे समन्वयक प्रा.डॉ.आप्पासाहेब चौगुले सहभागी संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


















