मोहोळ : अनगरच्या इतिहासात अनगर ग्रामपंचायत नगरपंचायत मधे रूपांतर झाल्यानंतर लागलेल्या पहिल्याच निवडणुकीत बिनविरोधची परंपरा खंडित झाली असून नगराध्यक्ष पदासाठी ३ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर एकूण १७ नगरसेवकापैकी १६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. एका प्रभागात दोन अर्ज आल्यामुळे नगरसेवकाच्या १ जागेसाठी निवडणूक लागली आहे.
स्व. लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्या कालखंडापासून अनगर ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा होती. दरम्यान अनगर नगर पंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांची उमेदवारी दाखल केली होती .

ही निवडणूक बिनविरोध होणार असे वातावरण असताना अत्यंत नाट्यमयरित्या झालेल्य घडामोडी मध्ये अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये येथील उज्वला महादेव थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी सरस्वती भागवत शिंदे यांचा तिसरा अर्ज अपक्ष दाखल झाला असून नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३ अर्ज दाखल झाले आहेत.तर १७ नगरसेवकापैकी १६ प्रभागातील १६ नगरसेवक बिनविरोध झाले आहेत .
एका प्रभागांमध्ये २ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली.

बिनविरोध १६ नगरसेवक याप्रमाणे :
काजल राजकुमार मोरे, विशाल आप्पाराव थिटे, उमेश कल्याण भडकवाड, श्रीकांत जगन्नाथ घाटोळे, विजया भीमराव कोकरे, सीमा जयराम गुंड, वैशाली विष्णू पाचपुंड, गणेश महादेव गुंड, विठ्ठल आण्णा कारंडे, सुरेखा गजानन डिकोळे, विद्या बंडू शिंदे, विक्रम रखमाजी गुंड, नारायण कल्याण गुंड, शितल तात्या गायकवाड, रूपाली सोमनाथ शिंदे, झुलेखा अनवर मुलाणी
” माझ्या जुन्या पक्षातील नेत्यांना जिल्ह्यात उमेदवार मिळेनात, त्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने गावातील एकोपा दूर करून येथे भांडणे लागण्याच्या उद्देशाने बाहेरून आयात केलेला उमेदवार लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लागल्याचे दुःख नाही मात्र सलोख्याने आणि एकोप्याने राहत असलेल्या गावात विष पेरण्याचे काम सुरू आसल्याचा आरोप करित निवडणूक आयोगावर दबाव आणून येथे निवडणूक लादण्याचा प्रयत्न करणे हे इथल्या कुठल्या ऐबू गैबु चे काम नाही .मी ज्या पक्षात काम करीत होतो त्या पक्षातल्या वरिष्ठांकडून हा प्रकार केला असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.” – राजन पाटील,माजी आमदर , मोहोळ.
फोटो :नगर नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठीच्या तीन महिला उमेदवारांचे फोटो


















