सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने विमानतळ मुख्य प्रवेशद्वार लगेच अतिक्रमित दहा खोके जेसीबीच्या साह्याने निष्काशित करण्यात आले.
शहरातील विमानतळ परिसरात विमानाच्या उडाणा दरम्यान पक्षी व इतर अडथळे येत आहेत. यामुळे येथील अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. आज पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने विमानतळा समोरील मुख्य प्रवेशद्वार लगत असलेल्या दहा खोकी जागेवरच जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


















