सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी सालाबाद प्रमाणे यंदाही भिम गीत आदरांजली कार्यक्रम 2025 संदर्भात सोलापूर महानगरपालिका हिरवळीवर डॉ.वसंत गजघाटे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आलेल होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
नूतन पदाधिकारी असे — अध्यक्ष :प्रा. जीवन शिंदे, उपाध्यक्ष :दिनेश बनसोडे, विशाल बनसोडे, कार्याध्यक्ष: धनराज तुपसाखरे, सचिव:दत्ता सोनवणे, सहसचिव:अनिलकुमार इंगळे, खजिनदार:अरुण डुरके, सहखजिनदार :कपिल आनंद बनसोडे, अनिल वाघमारे, ऑडिटर:भीमराव घडेराव आदी. प्रास्ताविक माजी अध्यक्ष प्रा.शंकर खळसोडे यांनी केली व आभार बाळासाहेब गायकवाड यांनी मानले.
या बैठकीस प्रा. शंकर खळसोडे, भीमराव घडेराव, पाटील ,बाळासाहेब गायकवाड, ब्रम्हानंद मस्के, शीतलकुमार माने, रमेश कांबळे,मारुती येरवडे,अरुण डुरके,आनंद बनसोडे, कपिल बनसोडे, विशाल बनसोडे, दिनेश बनसोडे, दत्ता सोनवणे, अनिल वाघमारे,बाबासाहेब कांबळे, प्रा.जीवन शिंदे आदी उपस्थित होते.


















