वेळापूर – दि .१५/११/२५ ते १७/११/२५ दरम्यान नाशिक (पंचवटी ) या ठिकाणी झालेल्या १९ वर्ष वयोगट मुली शालेय राज्यस्तर खो-खो स्पर्धेत वेळापूर ता. माळशिरस येथील इंग्लिश स्कूल, वेळापूर, व अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ संघाने झालेल्या स्पर्धेत राज्यात पाचवा क्रमांक मिळविला . इंग्लिश स्कूलची खेळाडू कु प्राजक्ता सोमनाथ बनसोडे हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे व अयोध्या या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच १९ वर्ष वयोगट मुले यांच्या गटातून राखीव मधून इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी प्रणव दिलीप आडसूळ याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
दोघांना क्रिडाशिक्षक सतीश कदम, शिवाजी जाधव, सोमनाथ बनसोडे, अर्धनारी नटेश्वर क्रिडामंडळाचे अध्यक्ष जावेद मुलाणी, श्रीनाथ खटके, जावेद आतार यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे
संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम , संस्थेच्या संचालिका डॉ. सौ मीनाक्षी कदम, सचिवा डॉ. सौ. प्रियदर्शनी महाडिक, संचालिका सौ. तेजस्विनी कदम, शाळा समिती चेअरमन प्रतापराव पाटील, प्राचार्य आर बी पवार , उपमुख्याध्यापक पठान शिवशरण , पर्यवेक्षक सावळे बी एस , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अमोल मंडलिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप जगदाळे, उपाध्यक्ष प्रियंका पोरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, माजी खेळाडू, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.




















