Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बालसंशोधक अरजित मोरेंच्या वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोड

तरुण भारतbyतरुण भारत
November 20, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे –  ‘भारताला २०४७पर्यंत एक ‘विकसित देश’ बनविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आणि सर्वच देशवासीयांचे स्वप्न आहे. ही स्वप्नपूर्ती विज्ञान व तंत्रज्ञानाच्या लोकसंवादाशिवाय साध्य होणार नाही. बाल संशोधक अरजित मोरे याने ‘जिज्ञासा’ पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोड दिली आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल’ असे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. आशिष लेले यांनी बुधवारी (दि. १९) व्यक्त केले.

पुणे येथील एनसीएलच्या सभागृहात शालेय विद्यार्थी अरजित अमोल मोरे याच्या ‘जिज्ञासा: फ्रॉम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन संचालक डॉ. लेले व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉ. वाफिया मसीह, डॉ. नरेंद्र कडू, डॉ. एम. कार्तिकेयन, डॉ. महेश धरणे, डॉ. राकेश जोशी, डॉ. राजेश गोन्नाडे, डॉ. शुभांगी उंबरकर तसेच महावितरणचे श्री. अमोल मोरे, डॉ. संतोष पाटणी, श्री. निशिकांत राऊत यांची उपस्थिती होती. या पुस्तकाच्या लेखनासाठी अरजित मोरे याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणती मित्रा यांनी कौतुक केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षणाची संधी तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा अनुभव व प्रयोगशीलतेसाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘जिज्ञासा- एक दिवस शास्त्रज्ञ म्हणून’ (One Day as a Scientist) हा उपक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मुंबई येथील शालेय विद्यार्थी अरजित अमोल मोरे याने सीएसआयआरच्या पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये एक दिवस वैज्ञानिक म्हणून घालवला होता. या अनुभवावर आधारित त्याने ‘जिज्ञासा: फ्रॉम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचे लेखन केले आहे.

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, ‘अरजित मोरे याचे  हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचले पाहिजे. विद्यार्थी दशेतील वैज्ञानिक कुतूहल व त्याचे नेमके वास्तव याची मांडणी अरजितने लेखनातून केली आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांना संशोधनासाठी निश्चित प्रेरणा मिळणार आहे’. यावेळी सर्व शास्त्रज्ञ व उपस्थितांनी मनोगतातून अरजितच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि निरीक्षण क्षमतेचे कौतुक केले.

अरजित मोरे हा जिल्हा इन्स्पायर मानक अवार्ड २०२५ व होमी भाभा बालवैज्ञानिक सुवर्णपदक 2024 चा मानकरी आहे. त्याचे तीन संशोधन लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून त्याने इल्यूम्ब्रेला (Illumbrella), स्पाईनोगिअर (Spinogear) व गटरगार्ड (Gutterguard) यासारख्या सामाजिक उपयुक्तता असलेले संशोधन विकसित केली आहे.

यापुस्तकातील ११ प्रकरणामध्ये अरजितने डीएनए सिक्वेन्सिंग, सस्टेनेबल केमिस्ट्री, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पर्यावरण विज्ञान यांसारख्या विषयांचा अभ्यास कसा केला याचे सोप्या भाषेत वर्णन केले आहे. ‘जिज्ञासा’ उपक्रमाचा फायदा व शास्त्रज्ञांनी केलेले मार्गदर्शन कसे महत्त्वाचे ठरले याबाबत त्याने मनोगत व्यक्त केले. लवकरच या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित होणार आहे.

फोटो नेम – Arjit Amol More JIGYASA 19-11-2025

फोटो नेम – पुणे : बाल संशोधक अरजित अमोल मोरे लिखित ‘जिज्ञासा: फ्रॉम क्युरिओसिटी टू क्लॅरिटी’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आशिष लेले व श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले

Post Views: 60
Previous Post

आलेगाव खुर्दच्या उपसरपंचपदी विजया पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

प्राजक्ता बनसोडे व प्रणव अडसूळ यांची महाराष्ट्र खोखो संघात निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्राजक्ता बनसोडे व प्रणव अडसूळ यांची महाराष्ट्र खोखो संघात निवड

ताज्या बातम्या

पोलिसांनी सात तासात मुलीला केले नातेवाईकांच्या स्वाधीन #solapurnews #news #marathinews

May 31, 2026

दिल्ली मुंबईसह अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट उधळला #viral #news

May 31, 2026

जरांगे पाटील यांनी मध्यरात्री १ वाजता उपोषण घेतले मागे #viral #news #marathinews

May 31, 2026

पीच तयार करताना रोलरखाली गेल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू #marathinews #news

May 31, 2026

आनंदोत्सवात साजरी झाली राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती

May 31, 2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

May 31, 2026
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

May 31, 2026

महापालिका शाळांमध्ये सोमवार पासून नव्या पाठ्यपुस्तकांचे बीटनिहाय वाटप

May 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0888098

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697