गंगापूर – शिल्लेगांव पोलीस ठाणे हद्दीतील बाभुळगाव (नांगरे), धामोरी, पाडळसा, देऱ्हळ, किन्हळ,डोंणगाव,रायपूर,पिपंळगाव,दिवशी,पाचपीरवाडी,वरझडी,देवळी,सुलतानाबादसह पोलीस ठाणे हद्दीतील इतर गावतही बिबट्या शेतकरी व नागरिकांनी पाहिल्याचे सांगितले.
बिबटयाच्या पायाचे ठसेही तज्ञ व्यक्तींनी तपासले आहे त्यामुळे शेतकरी व गावकरी बंधूनी शेतात जाताना काळजी घ्यावी कोणीतरी व्यक्ती सोबत ठेवावा पुरेश्या प्रकाशासाठी बॅटरी,शिट्टी ठेवावी आवाजासाठी फटाके ठेवावे,जनावरांना अंधारात बांधून ठेऊ नये.
जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन शिल्लेगाव पोलिसांच्यावतीने करण्यात येत असून वनविभागालाही तसे कळवण्यात आले आहे.अशी माहिती शिल्लेगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सांगितले आहे.



















