भोकरदन : नगरपरिषद निवडणूक २०२५, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या शुभहस्ते व मा खा डाॅ कल्याणराव काळे, जिल्हा पक्षप्रभारी अशोक पाटील निलंगेकर, आ राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख,कल्याणराव दळे,विधानसभा पक्षप्रभारी रविंद्र काळे, समद पटेल, अशोक डोळस, सय्यद आक्रम, जिल्हातील आजी माजी जिल्हाध्यक्ष, ता.अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत दिं २१ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी १० वा. भोकरदन येथील सिल्लोड रोड वरील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व पक्षाच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमास जालना जिल्हातील काँग्रेस पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते भोकरदन शहरातील आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भोकरदन शहराध्यक्ष शेख अ.सत्तार यांनी केले आहे.



















