सोलापूर – भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक भारतीयांना गेल्या ७५ वर्षांपासून एक संघ ठेवून सर्वांना स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय देण्यात येत आहे. मात्र असे असताना अलीकडच्या काळात संविधानाची मुद्दाम पायमल्ली केली जात आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण केले जात आहेत. याला वाचा फोडण्यासाठी तसेच तरुणांमध्ये संविधान बद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी
तसेच संविधान बचावासाठी दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान बचाव राहिली काढली जाणार आहे. या रॅलीचे नेतृत्व ८५ वर्षांचे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुभान बनसोडे हे करणार आहेत. त्यामुळे या रॅलीस वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ही रॅली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सम्राट चौक येथून सुरू होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी वेस पोलीस चौकी मार्गे सरस्वती चौक, हुतात्मा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या संविधान बचाव रॅलीत संविधान समर्थकांनी सहभाग नोंदवून संविधानाप्रती जागरूकता दाखवावी असे आवाहन समितीच्या वतीने सुभान बनसोडे यांनी केले आहे.



















