Monday, December 15, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला २४ पासून

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत सोमवार, दि. २४ नोव्हेंबर ते रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, माईर्स एमआयटीचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे व संचालक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.


या व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं ४.०० वा. होईल. या समारंभासाठी स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर इस्त्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ.प्रमोद काळे व नवी दिल्ली येथील प्रसिद्ध लेखक, संशोधक आणि आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी.के.भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड हे उपस्थित राहणार आहेत.
व्याख्यानमालेचा समारोप रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. होईल. प्रसिद्ध लेखक व ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री.विश्वास पाटील हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत हे अध्यक्षस्थान भूषवतील.


२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सायं. ४.०० वा. होणार्‍या व्याख्यानमालेत वैश्विक स्तरावरील किमया आश्रमचे स्वामी कृष्णा चैतन्य (आधुनिक जीवन पद्धती आणि अध्यात्म), इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू (मेडिसीन २५, पारंपारिक ज्ञानातील मुळे आणि शांतता), पुणे येथील डीआरडीओचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर (संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता हे विश्वगुरू भारताच्या दिशेने एक पाऊल), ओरिजिनोट वेलनेस चे सीईओ केशव वेल्हाळ (ओम टू क्वांटम कॉम्प्युटिंग-ए पाथवे फॉर वर्ल्ड पीस) आणि सनदी अधिकारी व महाराष्ट्र राज्याचे उपलोकायुक्त डॉ. संजय भाटिया (जनसेवेत विश्वशांती)अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.


या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्यशाळा होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ.संजय उपाध्ये, किंकर विठ्ठल रामानूज व किंकर विश्र्वेशरै आनंदा, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे सह. अधिष्ठाता डॉ.बी.एस.नागोबा, यशदा पुणेचे संचालक रंगनाथ नाईकडे, फिल्म निर्माता व अभिनेता मुकेश खन्ना, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या एलटीसीचे संचालक सुनील लोढा व दिपाली लोढा, वरिष्ठ अभियंता विष्णू भिसे, सुप्रसिद्ध गीतकार समिर अंजान, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रभारी डॉ. ताहेर एच. पठाण, परमपूज्य स्वामी सवितानंद, प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण हे विविध विषयांवर विचार मांडतील.


प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या मध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी स. ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचे आयोजन क्रीडा विभागाचे संचालक अभय वाघ व योगगुरु श्री. अनंत कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.


‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.
या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमाले मागील प्रमुख उद्देश आहे.
ही व्याख्यानमाला विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या प्रेरणेने तसेच,  माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.

जनसंपर्क विभाग,
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे.

Post Views: 23
Previous Post

निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट 

Next Post

संविधान बचाव रॅलीचे ८५ वर्षाचे सुभान बनसोडे नेतृत्व 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संविधान बचाव रॅलीचे ८५ वर्षाचे सुभान बनसोडे नेतृत्व 

ताज्या बातम्या

खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून मेडदमध्ये तरूणाची आत्महत्या

December 15, 2025

ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने सर्जापूर मधील एकाचा मृत्यू

December 15, 2025

ऐतिसाहिक दमाणी रेल्वे पूलाने घेतला अखेरचा निरोप

December 15, 2025

यंदाची यात्रा प्रकाशमय करण्याचे वीरशैव व्हिजनचे आवाहन

December 15, 2025

शक्तीपीठ महामार्ग आरेखणात सोलापूर जिल्ह्यात बदल करू नका 

December 15, 2025

एकता महिला मंचातर्फे महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती व उद्योगावर मार्गदर्शन मेळावा

December 15, 2025

थंडीची हुडहुडी वाढली; गल्लोगल्ली शेकोट्या पेटल्या

December 15, 2025

भारताच्या विकासात कलाशिक्षणाची भूमिका महत्त्वाची

December 15, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

शिवसेनेचे आजपासून 18 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार

byतरुण भारत
December 15, 2025
0

सोलापूर - महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना दिनांक 15 ते 18 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते ५ या वेळेत...

अमोल शिंदे यांच्या हातून अनेक समाजकार्य घडो – मा. नगरसेवक किरण देशमुख

byतरुण भारत
December 14, 2025
0

सोलापूर – नागरिकांना लागणाऱ्या रोजच्या जीवनामध्ये महत्त्वाची कागदपत्रे काढण्याचे राहिलेल्यांसाठी महासेवा शिबिर हे एक उत्तम कार्य माजी नगरसेवक जिल्हाप्रमुख अमोल...

चन्नवीर चिट्टें सारख्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी – जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुनशिवाचार्य

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक...

मवीआ चा महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवू – माजी मंत्री चंद्रकांत खैरे

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महाविकास आघाडीचा महापौर सोलापूर महानगरपालिकेत बसवण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही लढणार आहोत. आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0562601

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697