वेळापूर – येथील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व वेळापूर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाराजे घाडगे मित्र मंडळच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना ५००० ‘वह्या वाटप हा कार्यक्रम वेळापूर,पिसेवाडी,भाकरेवाडी, गावातील एकूण १७ शाळांवरती मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच बापूसाहेब मुंगुसकर, केंद्रप्रमुख बापूराव नाईकनवरे, वेळापूर मुली शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित सरवदे,वेळापूर मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक युनूस मुलाणी, पिसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बनकर, मुख्याध्यापक किरण काळे, पिसेवाडीचे दादा भाकरे,शंकर वाघमारे,सुभाष भाकरे,अभिजित साठे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या हस्ते एकूण १२०० गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे हे होते.या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सरपंच रजनीश बनसोडे म्हणाले, “आर्थिक अडचणींमुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा दादाराजे घाडगे मित्र मंडळ याचा कार्यक्रमामागील मुख्य विचार आहे. शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना छोटीशी मदत करून त्यांना प्रोत्साहन देणे, हे आमचे कर्तव्य आहे.”
सरपंचांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले. “शिक्षण हाच प्रगतीचा आधार आहे आणि दादाराजे घाडगे मित्र मंडळ विद्यार्थ्यांना हा आधार देत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या वह्यांचा उपयोग करून मन लावून अभ्यास करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक उत्तम कटके, नितीन चव्हाण, सुभाष गायकवाड, जीवन रनवरे, नवनाथ माने, नवनाथ धांडोरे,अखिलअहमद बाजेबुऱ्हाण,रामभाऊ बुरकुले, प्रवीण पांगे उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी दादाराजे घाडगे मित्र मंडळने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नवनाथ धांडोरे यांनी केले. व आभार किरण काळे यांनी मानले.



















