फुलवळ / नांदेड – कंधार तालुक्यातील मौजे मुंडेवाडी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथे आज पासून दि.२५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान श्री खंडेरायाच्या यात्रेचे आयोजन यात्रा कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता श्री खंडेरायाचे लग्न, तसेच रात्री ९ वाजता जय हनुमान संगीत भजनी मंडळ वाखरड यांचा भजनी गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०० ते ६.०० वाजता जय मल्हार वाघ्या मंडळ पांडुरण ता.भोकर यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम होईल.दि.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता कुस्त्यांची भव्य दंगल असून प्रथम बक्षीस २ हजार ५५१ रुपये व व्दितीय बक्षीस १हजार ५५१ रुपये यात्रा कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.तरी संध्याकाळी ठीक नऊ वाजता पायल म्युझिकल नाइट ऑक्रेस्ट असा लावण्याचा दणदणीत कार्यक्रम पार पडणार आहे. दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री खंडेरायाची पालखी मिरवणूक निघणार आहे. या यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व समस्त गांवकरी मंडळी मुंडेवाडीच्या वतीने करण्यात आले आहे,


















