Tuesday, May 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री रेणुकादेवी मंदिर गडपायऱ्या बाजुची लघु व्यवसायकांची प्रतिष्ठाने रिकामी होण्यास सुरुवात

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in marathwada
0
0
SHARES
166
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


माहूर / नांदेड – श्रीक्षेत्र माहूर गडावरील राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिर गडावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मातेच्या दर्शनासाठी २५० गड पायऱ्या चढणे-उतरणे असमर्थ असलेल्या भाविकांच्या सुविधेसाठी ५१ कोटी रुपयांचा भरीव निधी देऊन लिफ्ट आणि स्कायवाकच्या कामाला मंजुरी दिली होती. त्या प्रकल्पाचे काम अनेक अडथळे पार करत संथगतीने का होईना सध्या प्रगतीपथावर आहे.परंतु ह्या प्रकल्पाचे काम करताना पायऱ्या चढताना उजव्या बाजूला दुकाने असलेल्या अनेक लघुव्यवसायिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या दुकानांना स्थलांतरित करण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे .मात्र आता प्रशासनाकडून यावर उचित तोडगा काढण्यात आला असून,संभाव्य पार्किंगच्या ठिकाणी गाळे निर्मिती करून त्यांना प्रतिष्ठान रिकामी करण्यात सांगण्यात आल्याने दि.२४ नोव्हेंबर रोजी लघु व्यावसायिकांनी तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या उपस्थितीत आपले प्रतिष्ठान रिकामे करण्यास सुरुवात केल्याने लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांना अडीचशे पायऱ्या चढण्या साठी त्रास होत होता. सदरील बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी भाविकांना सुलभ व जलद दर्शन सुविधा मिळावी यासाठी ५१ कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली होती. परंतु येथे पायऱ्याच्या शेजारी असलेल्या लघु व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे डाव्या बाजूकडील दरड मध्ये भराव टाकून येथे गाळे निर्मिती करण्यात आली असून, त्या ठिकाणी सदरील ३५ लघु व्यावसायिकाच्या स्थलांतराचा प्रश्न निकाली काढण्यात आला. त्यामुळे काहीं व्यवसायिकांनीआपापले प्रतिष्ठान काढून घेण्यास सुरुवात केली असून, काही प्रतिष्ठाने रिकामे करण्यात आलेली आहेत.

सदरील लिफ्ट आणि स्काय वॉक चे काम तसेच व्यवसायिकांचे स्थलांतर व इतर विकास कामे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला, कार्यकारी अभियंता विशाल चोपडे तसेच श्री रेणुका देवी संस्थान प्रशासन यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजीत जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी.के. भिसे,उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव, क.अभियंता पवन हंचाटे,सहाय्यक अभियंता प्रफुल कांबळे, स्थापत्य अभियंता सहाय्यक संतोष भोकरे, विश्वनाथ कांबळे, श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे व गुरुबक्षानी कंट्रक्शन कंपनी यांचे मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असून, आता दुकाने स्थानांतरण सुरू होण्यास सुरुवात झाल्याने लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाला गती मिळणार आहे.
त्यामुळे लवकरच नजिकच्या काळात श्री रेणुकादेवी मंदिरच्या जवळपास अडीचशे पायऱ्या चढणे-उतरणे करण्यासाठी असमर्थ असलेल्या भाविकांच्या सोयीसाठी लिफ्ट आणि स्कायवॉक हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रकल्प धावणार असल्याचे दिसून येत आहे.

Post Views: 373
Previous Post

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पत्रकार परमेश्वर पेशवे यांचा आमदार भीमराव केराम यांनी केला सन्मान

Next Post

मुंडेवाडी येथे खंडेरायाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम व भव्य कुस्ताची दंगल.!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मुंडेवाडी येथे खंडेरायाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम व भव्य कुस्ताची दंगल.!

ताज्या बातम्या

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

May 18, 2026
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

May 18, 2026

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कान्समध्ये मराठमोळा अंदाज #viral #maharashtranews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; मनपात महापौर, उपमहापौर ई- बाईकवर तर गटनेता नरेंद्र काळे आले सायकलवर #aajsolapur

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

सोलापूरचे महेंद्र गायकवाड देशाचे ३९ वे हिंदकेसरी #viral #solapurnews

May 18, 2026

पैसे लुटून चोरट्यानी दहिटणे गावच्या शेतात टाकले एटीएम मशीन #marathinews #solapurnews

May 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0870524

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697