सोलापूर शहर व ग्रामीणमधील वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ई-चालनाद्वारे दंड केला आहे. त्यात शहरातील सव्वालाख तर ग्रामीणमधील जवळपास दीड लाख वाहनचालकांचा समावेश आहे. १० तारखेपर्यंत त्यांना स्वत:हून दंडाची रक्कम भरता येणार आहे. मुदतीत दंड न भरल्यास संबधितांवर न्यायालयाच्या माध्यमातून दंड वसुलीची कारवाई केली जाणार आहे. त्यासंबंधीची नोटीस पावणेतीन लाख वाहनधारकांना पाठवल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरून प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. कधी मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे तर कधी मोबाईलवर बोलत वाहन चालवले जाते. लेन कटिंग, हेल्मेट नाही, दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणे, असेही प्रकार सातत्याने सुरु आहेत. त्या वाहनधारकांना इंटरसेप्टर वाहनांद्वरे ई-चालानच्या माध्यमातून ऑनलाइन दंड केला जातो. सोलापूर शहर पोलिसांनी एक लाख २१ हजार ६९४ वाहनांवर तशी कारवाई केली आहे.कारवाई होऊनही प्रलंबित दंड न भरणाऱ्यांवर आता न्यायालयात खटला भरला जाणार आहे. त्यासंबंधीची नोटीस त्या सर्वांनाच पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर पाठवली आहे. ११ फेब्रुवारीला लोक अदालतीतून त्यांनी दंड भरणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी त्यांना कुठेही दंड भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान शनिवारी लोक अदालतीचे आयोजनजिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांवर सामोपचाराने तोडगा काढण्याच्या उद्देशाने ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी दिली. जिल्हा न्यायालयासह जिल्हाभरातील सर्वच न्यायालयामध्ये लोक अदालत पार पडेल. त्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे २५ हजार तर दाखलपूर्व खटल्यांची संख्या २८ हजारांपर्यंत आहे.दंडाची रक्कम येथे भरण्याची सोयवाहनधारकांना प्राप्त झालेले ई-चालानच्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करून त्यातूनही दंड ऑनलाइन भरता येतो. ‘महाट्राफिकचालन’द्वारे पण दंड भरण्याची सोय आहे. वाहतूक शाखेचे कार्यालय किंवा रस्त्यांवरील वाहतूक पोलिस हवालदारांकडील मशिनद्वारे देखील दंड भरता येतो. वाहतूक पोलिसांकडील ई-चालान डिव्हाईसद्वारे डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येईल. ई-चालान मशीनमधील क्युआर कोड स्कॅन करून व ‘महाट्राफिक’ ॲपवरूनही दंडाची रक्कम भरण्याची सोय असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अजय परमार यांनी दिली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...