वैराग – श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ७३ वा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित्त श्री साई आयटीआय च्या प्रांगणात भारतीय संविधान प्रस्तावना आणि संविधान शपथ वाचन करण्यात आली .
तसेच संविधानावर आधारित लघुप्रदर्शनाचे उद्घाटन श्री साई शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ.मीरा सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्याम गोवर्धन , सर्व शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश घुगे यांनी केले तर आभार रोहित पाटील यांनी आणि सूत्रसंचालन संभाजी जाधव यांनी केले.



















