सोलापूर : भारतीय जनता पक्षातर्फे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बूथ सशक्तीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
भाजप शहर मध्य-मध्य मंडलाची बैठक भाजपच्या शहर कार्यालयात आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश समन्वयक कृष्णा चौधरी उपस्थित होते. या बैठकीत बूथ पदाधिकाऱ्यांना बूथ सशक्तीकरण मोहिमेबाबत मार्गदर्शन सविस्तर करण्यात आले.
यावेळी चौधरी म्हणाले की, बूथ कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्या संदर्भातील माहिती गूगल फॉर्ममध्ये भरावी. केंद्र व राज्य शासनाचे वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी जसे लाडकी बहीण, विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन खाते, आयुष्मान भारतचे लाभार्थी यांची यादी तयार करावी. याशिवाय मतदार यादीची पडताळणी करावी.
यावेळी माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू म्हणाले, ‘माझे बूथ, सर्वात मजबूत’ हा फक्त एक कार्यक्रम नाही तर तो तळागाळातील भाजपच्या यशाचा सर्वात मजबूत दुवा आहे.जुन्या म्हणीप्रमाणे, एक थेंबही भांडे भरतो. त्याचप्रमाणे, पक्षाचे यश तेव्हाच मिळते जेव्हा प्रत्येक बूथ सर्वात मजबूत असतो.आज सोलापूर शहर मध्य मध्य मंडलाचा प्रत्येक भाजप कार्यकर्ता “माझे बूथ, सर्वात मजबूत” या संकल्पाने पुढे जात आहे, याचा आनंद आहे.
याप्रसंगी मंडलाचे अध्यक्ष नागेश सरगम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित बूथ मजबूत करण्यासाठी तळागाळात काम करणे आवश्यक आहे. हे काम सुरळीत पार पडावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत.सर्व मंडल कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित शक्ती केंद्रांना भेट देऊन त्यांचा विस्तार करण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटावे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित बूथ मजबूत करण्यासाठी “मेरा बूथ सबसे मजबूत”च्या धर्तीवर काम करावे. केंद्रात, राज्यसह सोलापूरकरांची पुन्हा सेवा करण्यासाठी भाजपला बळकटी दिली पाहिजे.
बैठकीस योगेश्वर कदम, संकेत होंडे, शहर उपाध्यक्ष अंबादास बिंगी, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, अनिल पल्ली, रवी कैय्यावाले, भारतसिंग बडूरवाले, दत्तात्रय पोसा, आनंद बिर्रू, सुनील पाताळे, पुरुषोत्तम पोबत्ती, जय साळुंखे, श्रीकांत वाडेकर, मंडल सरचिटणीस प्रशांत पल्ली, हरीश जंगम, मंडल उपाध्यक्ष राम गड्डम, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष लक्ष्मी बदलापूरे, मंडल युवा मोर्चाचे ओंकार होमकर, मंडल अल्पसंख्यांक अध्यक्ष एजाज सय्यद आधी सह मध्य मध्य मंडळातील शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख उपस्थित होते.
——————————————
सोलापूर : भाजप मध्य-मध्य मंडलाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना
कृष्णा चौधरी. यावेळी रामचंद्र जन्नू,
अंबादास बिंगी, नागेश सरगम आदी.



















