अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या परिसरात स्वामींचा महिमा पहायला मिळते, यामुळे या ठिकाणी श्रद्धा, शांती आणि शाश्वतता दिसून येत असल्याचे मनोगत मुंबई, चांदिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत स्वीयसहायक सुनील थोरात व पोलीस पथक उपस्थित होता.
यावेळी गोटू माने, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.



















