मंठा : मंठा तालुक्यातील केंदळी पाटीजवळ अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रॅक्टर मंठा पोलिसांनी पकडला असून सदर प्रकरणी चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमान जप्त केला असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
याप्रकरणी मिळाली माहिती अशी की , मंठा तालुक्यातील केंधळी जवळ संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास 3100 एफ 62 जी 94422 इंजिन क्रमांक असलेले ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये दहा हजार रुपये किमतीची अंदाजे एक ब्रास वाळू दहा हजार रुपये किमतीची पोलिसांनी पकडले असून सदर वाहन जप्त केले आहे.
अवैद्य रेतीसह चार लाख दहा हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर ठाण्यात जमा केले आहे. सदर कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या पथकाने केली आहे.


















