कुर्डूवाडी – नगरपालिकेमध्ये ज्या प्रभागाने दोन नगराध्यक्ष कुर्डूवाडीकरांना दीले त्यांच्या बालेकील्ल्यात मागील अनेक वर्षापासुन नागरीकांना विवीध समस्यांना सामोरे जावे लागत असून नगरपालिका येथील रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्याविषयक उपाययोजना करण्यात प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरले असल्याचे एकंदरीत स्थिती आहे.
मागील अनेक वर्षापासुन प्रभाग क्रमांक दहामध्ये मुस्लिम नेते माजी नगराध्यक्ष समिर मुलाणी व माळी समाजाचे नेतृत्व म्हणून ज्यांचेकडे पाहीले जाते ते माजी नगराध्यक्ष निवृत्ती गोरे हे अनेक वर्षापासुन प्रभाग दहाचे प्रतिनीधीत्व करतात यांच्याकडून प्रभागाचा विकास झाला आहे हे जरी नाकारता येत नसले तरी अजूनही येथील नागरीकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे.येथील दशरथ नगर मधील रस्ता असो वा निवृत्ती गोरे यांच्या शेजारील असलेले पाच ते सहा हाँस्पिटलकडे जाणारा रस्ता असो येथील रस्त्याची दुरावस्था अजूनही आहेच.अंडरग्राउंड गटारीचा प्रयोग याठीकाणी तात्रीक दृष्ट्या फेलच झालेला असल्याचे येथील नागरीक सागत आहेत.
सांडपाण्यासह पावसाचे पाणीदेखील पुरते त्यातुुन पास होत नाही.उलटे पावसामुळे तर घरात व घराशेजारी डबक्याचे स्वरूप येते यावरून नगरपालेकेेेेच्या कामकाजाविषयी नागरीकांना संताप आहे.विशेष म्हणजे मागील निवडणूकीत या प्रभागातील प्रतीनिधीत्व करणारे समिर मुलाणी हे जनतेतून निवडून आले होते तर दुसरे प्रतिनीधी निवृत्ती गोरे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.दोन्ही प्रतिनीधी एकाच प्रभागातील असून देखील जनतेच्या समस्या सोडवण्यात सध्य परीस्थीतीवरून पुर्णत्वाकडे गेले नसल्याचे दीसून येत आहे.यावेळी राष्टृवादी काँग्रेसकडून निवृत्ती गोरे यांच्या पत्नी सुरेखा गोरे या नगराध्यक्षपदासाठी तर नगरसेवकासाठी समिर मुलाणी हे निवडणूक लढवत आहेत. यापुढेतरी येथील लोकांच्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांच्या आहेत.
येथील जनतेला वेळेवर पिण्याचे पाणी देखील मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.मुलभूत गरजा पुर्ण करण्यात न.पा.प्रशासन पुरते अपयशी ठरल्याने येथील नागरीकात प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.याचा परिणाम असा झाला की येथील दोन मुख्य प्रवर्ग मुस्लिम व माळी समाजात मोठ्या प्रमाणावर फुट पडून निवडणूकीत प्रस्थापितांना विस्तापित करण्याचे स्वप्न बाळगत विवीध पक्षातुन उमेद्वारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उभे आहेत.
@ येथील पंचायत समिती ते प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात पाच ते सहा हाँस्पिटल्स आहेत.येथे रस्त्याची सुविधा व्यवस्थीत नसून दशरथ नगरमध्ये रस्त्याची दुरावस्था आहे.सांडपाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थीत नसून येथील भूयारी गटारी संकल्पणा पुर्णपणे फेल गेली आहे.पावसाचे पाणी भूयारी गटारीतून पास होत नाही.चार दीवसाआड पिण्याचे पाणी पाणी येते. यावर नवीन लोकसेवकांनी निवडून आल्यानंतर व्यवस्थीत उपाययोजना करावी.
राजाभाऊ सुसलादे. कुर्डूवाडी
























