कळंब / धाराशिव – नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवक करिता आज 2 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. 10713 पुरुष, 10245 असे एकूण 20958 मतदारांपैकी. 8003 पुरुष व 7231 स्त्री असे एकूण 15234 72.69 / मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी 7:30 वाजेपासून मतदानास सुरवात करण्यात आली. सकाळ पासुन ते दुपारी 1:30 पर्यंत 4249 पुरुष तर 3802 असे एकूण 8051 38,41 /.. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .
दुपार नंतर धिम्या गतीने मतदान सुरू होते नंर 4 च्या सुमारास मतदानाचा वेग घेतला 5:30 मतदान संपेपर्यंत. 8003 पुरुष तर 7231 स्त्री असे एकूण 15 234 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
























