सोलापूर दि. २ डिसेंबर -महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा रुग्णालय, सोलापूर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर, डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर, रोटरी क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिना निमित्त दि. १ डिसेंबर २०२५ रोजी जनजागरण सायकल रॅली काढण्यात आली.*
रॅलीच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे व रॅलीमध्ये सहभाग नोंदवीलेल्या विदयार्थ्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. व्हि.एम.जी.एम.सी.सोलापूर ए.आर.टी. प्लस सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस – वरेरकर यांनी केले आणि या वर्षीचे जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य *”अडथळयांवर मात करु, एकजूटीने एचआयव्ही/एड्स ला लढा देवू, नव परिवर्तन घडवू “* या बद्दल माहिती दिली.
*रॅलीच्याच्या उद्घाटनाप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी म्हणाले की, एच.आय.व्ही. ग्रस्त व्यक्तींविषयी असलेला भेदभाव व सामाजिक कलंक दूर करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. एच.आय.व्ही. एड्स प्रतिबंधाच्या कार्यात सातत्य असल्याने या रोगाविषयी असलेली भीती कमी झाले आहे. हा उपक्रम समाजात योग्य माहिती पोहोचवून निरोगी व संवेदनशील समाजनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.*
*जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी सोलापूर जिल्हयातील ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत एच.आय.व्ही. समुपदेशन, रक्तचाचणी व रुग्णांना मिळणारे औषधोपचार या सर्व सुविधा प्रभावीपणे राबविल्या जातात या बद्दलची माहिती दिली व सदर कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचारऱ्याचे कौतुक केले.*
*अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी रॅलीच्या नियोजनाचे तोंड भरुन कौतुक केले. एचआयव्ही/एड्स या आजाराबाबत समाजामध्ये असणारे गैर समज हे सर्व कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासूनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने खूप कमी झाले आहे. या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी हे अत्यंत धाडासाने व प्रामाणिकपणे याआजाराच्या रुग्णांना समुपदेशन, रक्तचाचणी, औषधोपचार, इतर शासकिय योजना व संदर्भ सेवांचा लाभ मिळवून देतात म्हणूनच रुग्णांचे आयुर्मान वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.*
रॅलीच्या सुरुवातीला एड्स बाबत जनजागृती व एचआयव्हीसह जगणाऱ्या विषयी आस्थेचे प्रतिक असणारी शपथ उपस्थित सर्वांना देण्यात आली.
*जागतिक एड्स दिन २०२५ एचआयव्ही/एड्स जनजागृती सायकल रॅलीचे उद्घाटन सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, डॉ. व्हि. एम.जी.एम.सी. सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व रॅलीस हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.*
यावेळी विभाग प्रमुख डॉ. विजय चिंचोळकर, सुक्ष्मजीव शास्त्र विभाग, विभाग प्रमुख डॉ. नागेश गड्डम, त्वचारोग विभाग, विभाग प्रमुख डॉ. प्रदिप गाडगीळ, शासकिय रक्तपेढी, डॉ. व्हि.एम.जी. एम.सी.सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे मा. अॅडव्होकेट लक्ष्मण मारडकर, महिला व नवजात शिशु रुग्णालय, सोलापूरच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. जयश्री ढवळे, डॉ.अग्रजा चिटणिस, रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर, सचिव निलेश पोफलिया, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा सकट, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास शासकिय व निमशासकिय संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सायकल रॅली जिल्हा रुग्णालय, गुरुनानक चौक येथून सुरु होवून गुरुनानक चौक, तालूका पोलिस स्टेशन, शानदार चौक, गेटयाल चौक, पाथरुड चौक, संजय गायकवाड चौक, सिध्दार्थ सोसायटी, मौलाली चौक, सोलापूर ऑफिसर क्लब या मार्गाने निघून समारोप ही जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.*
सुत्रसंचालन दिनेश राठोड, सुनावी शेख व कपिल भालेराव यांनी केले. स्वागत गीत वंदना तिनईकर यांनी गायले तर आभार डॉ. सुनीता गायकवाड यांनी केले.
फोटो ओळी : *जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित सायकल जनजागृती रॅलीचे झेंडा दाखवून व आकाशात फुगे सोडून उद्घाटन करताना मान्यवर दिसत आहेत.*

























