Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जागतिक एड्स दिनाच्या सायकल जनजागरण रॅलीत ५०० सायकलस्वार युवक युवतीचा सहभाग

तरुण भारतbyतरुण भारत
December 3, 2025
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  दि. २ डिसेंबर -महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा रुग्णालय, सोलापूर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर, डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर, रोटरी क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिना निमित्त दि. १ डिसेंबर २०२५ रोजी जनजागरण सायकल रॅली काढण्यात आली.*

रॅलीच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे व रॅलीमध्ये सहभाग नोंदवीलेल्या विदयार्थ्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. व्हि.एम.जी.एम.सी.सोलापूर ए.आर.टी. प्लस सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस – वरेरकर यांनी केले आणि या वर्षीचे जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य *”अडथळयांवर मात करु, एकजूटीने एचआयव्ही/एड्स ला लढा देवू, नव परिवर्तन घडवू “* या बद्दल माहिती दिली. 

*रॅलीच्याच्या उद्घाटनाप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी म्हणाले की, एच.आय.व्ही. ग्रस्त व्यक्तींविषयी असलेला भेदभाव व सामाजिक कलंक दूर करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. एच.आय.व्ही. एड्स प्रतिबंधाच्या कार्यात सातत्य असल्याने या रोगाविषयी असलेली भीती कमी झाले आहे. हा उपक्रम समाजात योग्य माहिती पोहोचवून निरोगी व संवेदनशील समाजनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.*

*जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी सोलापूर जिल्हयातील ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत एच.आय.व्ही. समुपदेशन, रक्तचाचणी व रुग्णांना मिळणारे औषधोपचार या सर्व सुविधा प्रभावीपणे राबविल्या जातात या बद्दलची माहिती दिली व सदर कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचारऱ्याचे कौतुक केले.*

*अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी रॅलीच्या नियोजनाचे तोंड भरुन कौतुक केले. एचआयव्ही/एड्स या आजाराबाबत समाजामध्ये असणारे गैर समज हे सर्व कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासूनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने खूप कमी झाले आहे. या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी हे अत्यंत धाडासाने व प्रामाणिकपणे याआजाराच्या रुग्णांना समुपदेशन, रक्तचाचणी, औषधोपचार, इतर शासकिय योजना व संदर्भ सेवांचा लाभ मिळवून देतात म्हणूनच रुग्णांचे आयुर्मान वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.*

रॅलीच्या सुरुवातीला एड्स बाबत जनजागृती व एचआयव्हीसह जगणाऱ्या विषयी आस्थेचे प्रतिक असणारी शपथ उपस्थित सर्वांना देण्यात आली.

*जागतिक एड्स दिन २०२५ एचआयव्ही/एड्स जनजागृती सायकल रॅलीचे उद्घाटन सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, डॉ. व्हि. एम.जी.एम.सी. सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व रॅलीस हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.*

यावेळी विभाग प्रमुख डॉ. विजय चिंचोळकर, सुक्ष्मजीव शास्त्र विभाग, विभाग प्रमुख डॉ. नागेश गड्डम, त्वचारोग विभाग, विभाग प्रमुख डॉ. प्रदिप गाडगीळ, शासकिय रक्तपेढी, डॉ. व्हि.एम.जी. एम.सी.सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे मा. अॅडव्होकेट लक्ष्मण मारडकर, महिला व नवजात शिशु रुग्णालय, सोलापूरच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. जयश्री ढवळे,  डॉ.अग्रजा चिटणिस, रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर, सचिव निलेश पोफलिया, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा सकट, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास शासकिय व निमशासकिय संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सायकल रॅली जिल्हा रुग्णालय, गुरुनानक चौक येथून सुरु होवून गुरुनानक चौक, तालूका पोलिस स्टेशन, शानदार चौक, गेटयाल चौक, पाथरुड चौक, संजय गायकवाड चौक, सिध्दार्थ सोसायटी, मौलाली चौक, सोलापूर ऑफिसर क्लब या मार्गाने निघून समारोप ही जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. वर्षा डोईफोडे  यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.*

सुत्रसंचालन दिनेश राठोड, सुनावी शेख व कपिल भालेराव यांनी केले. स्वागत गीत वंदना तिनईकर यांनी गायले तर आभार डॉ. सुनीता गायकवाड यांनी केले.

फोटो ओळी : *जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित सायकल जनजागृती रॅलीचे झेंडा दाखवून व आकाशात फुगे सोडून उद्घाटन करताना मान्यवर दिसत आहेत.*

Post Views: 143
Previous Post

भूमी आभिलेख कार्यालयातील कुचकामी कर्मचार्‍याच्या निषेधार्थ कार्यालयास कुलूप ठोकून कोंडले

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा

ताज्या बातम्या

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

राऊताना माण मधून आला आहेर #viral #news #marathinews

August 4, 2026

माजी राज्यपाल व गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचं निधन #marathinews

August 4, 2026

नगर अभियंता अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा #solapurnews

August 4, 2026

पहा धडकी भरणारा प्रसंग #viral

August 4, 2026

आता सरकारी सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही #viral

August 4, 2026

पुण्यात बाईक रायडर्सची पोलिसांनी जिरवली #viral#cmomaharashtra #marathinews

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1026428

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!